myMPFS

myMPFS

Share

MPFS is the flag bearer of Maharashtrians in UAE. We arrange cultural events, entertainment programs and community initiatives.

28/09/2026

विनोद, भावना आणि वास्तवाचा सुंदर मिलाफ असलेले, हसवत-हसवत नात्यांकडे नव्याने पाहायला लावणारे नव्या पिढीचे हे आगळे वेगळे नाटक!

दिनांक: ४ ऑक्टोबर २०२६
वेळ: ५:३० ते ८ पर्यंत
स्थळ: स्विस इंटरनॅशनल सायंटिफिक स्कूल, अल जदाफ, दुबई
(गेट ओपन ४:३० वाजता)

आपली जागा आजच निश्चित करा.
RSVP साठी Google Form आणि MPFS App हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. कृपया यापैकी कोणत्याही एका माध्यमातूनच RSVP करावे.

गुगल फॉर्म link for मेंबर्स RSVP आणि Guest Passes
https://forms.gle/saz9mLr5h2PynjyD7

अधिक माहितीसाठी संपर्क:
MPFS - 050 861 6737
सौ. रमा साठे - 052 925 0113
श्री. पराग मुळे - 050 824 8467
श्री. विलास परब - 050 506 1209

स्वागतोत्सुक,
कार्यकारिणी २०२६ - २७
महाराष्ट्र मंडळ दुबई.

​ UAEEvents DubaiEvents DubaiTheater DubaiCulture MyDubai

24/09/2026

मंडळी, हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्र मंडळ दुबई च्या सदस्यांसाठीच आहे. लवकरात लवकर खालील Google Form भरून आपली जागा निश्चित करावी.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScekrD8wOeYeU2BXT9zNRkJ8KVZI6bxY-LE_CjTXa4NovLjOg/viewform?pli=1

स्वागतोत्सुक,
कार्यकारिणी २०२६ - २७
महाराष्ट्र मंडळ दुबई.

Photos from myMPFS's post 23/09/2026

परदेशात असूनही मराठी माती विसरली नाही! 🙏

पाच दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली आणि बाप्पा.. तुझा निरोप घ्यायची वेळ आली...
जाता जाता तुझा अथांग आशीर्वाद आणि तुझी माया आमच्या पाठीशी अशीच राहू दे.

महाराष्ट्र मंडळ दुबईच्या कुटुंबीयांनी एकत्र येत बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तांच्या जल्लोषात गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या दिमाखात पार पडले! 🥁🎉

डोळ्यांत अश्रू आणि ओठांवर फक्त एकच नाव...

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! 🌸🙏

Photos from myMPFS's post 22/09/2026

प्रवचनाची भक्तिमय वाणी, नृत्याची लयबद्ध साथ आणि सुरांचा गोडवा... 🌺✨

गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त मंडळात प्रवचन, नृत्य आणि गायनाचे रंगतदार कार्यक्रम पार पडले. बाप्पाच्या भक्तीत आणि या सांस्कृतिक सोहळ्यात अवघा परिसर रंगून गेला! 🙏🎶

श्री. पद्माकर कुलकर्णी यांच्या ओघवत्या प्रवचनाने उपस्थितांना भक्तिरसात न्हाऊ घातले, तर सौ. अश्विनी सुभेदार यांच्या मनमोहक नृत्याविष्काराने कार्यक्रमाला एक वेगळीच रंगत आणली.

या सोहळ्याला अधिक अर्थपूर्ण बनवले श्रीमती श्वेता सरस्वती यांनी, ज्या संस्कृत भारतीच्या माध्यमातून दुबईतील भारतीय समुदायात संस्कृत भाषेचे शिक्षण देऊन तिचा प्रसार करण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या उपस्थितीने आणि योगदानाने कार्यक्रमाला एक वेगळी सांस्कृतिक झळाळी मिळाली. 🙏

अभय सामंत आणि कुणाल देवमाने यांच्या गायन आणि सार्थक कवितांनी वातावरण भक्तिमय होऊन गेले. ✨️

16/09/2026

मंडळी नमस्कार!

गणेश चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. अथर्वशीर्षाच्या मंगल स्वरांनी भारलेले वातावरण आणि आरतीसाठी झालेली भाविकांची मोठी उपस्थिती अविस्मरणीय ठरली!

ऋषीपंचमीला श्री. पद्माकर कुलकर्णी यांच्या “रामायणातील रहस्य” या रसाळ व विद्वत्तापूर्ण प्रवचनातून रामायणातील प्रसंगांचा आगळा दृष्टिकोन अनुभवायला मिळाला.
आज सायंकाळी पुन्हा श्री. कुलकर्णी यांचे “कृष्ण चिंतन” या विषयावर प्रवचन आणि त्यानंतर रात्री ८:३० वाजता श्रींची आरती!

सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती!

कार्यकारिणी समिती 2026-27

Photos from myMPFS's post 15/09/2026

बाप्पाचे आगमन, मंगल आरती आणि सामूहिक अथर्वशीर्ष पठण! 🙏🌸🌸🌸

आपल्या मंडळात गणेशोत्सवाचा पहिला दिवस अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
अथर्वशीर्षाच्या स्वरांनी निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि त्यानंतर दर्शन आणि आरती साठी भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती खरोखरच अद्भूत होती!
​पहिल्या दिवसाची ही नयनरम्य झलक!

मंडळी, आजची संध्याकाळही विशेष आहे!

आज सायंकाळी श्री.पद्माकर कुलकर्णी यांचे "रामायणातील रहस्य" या विषयावर सायंकाळी ७ :०० वा.आयोजित करण्यात आले आहे.श्रींची आरती ०८:३० वाजता असणार.

सर्वांनी या आयोजनाचा लाभ घ्यावा ही विनंती! 🙏

कार्यकारिणी समिती 2026-27

13/09/2026

गणपती बाप्पा मोरया!!! मंगलमूर्ती मोरया 🙏🌸🌸🌸

Photos from myMPFS's post 12/09/2026

कला, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम!!

Photos from myMPFS's post 11/09/2026

महाराष्ट्र मंडळ दुबई आयोजित "Bappa Painting Workshop"!!
एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाची काही क्षणचित्रे !! ✨🎨

Want your business to be the top-listed Event/venue in Dubai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

ऑफिस No. 109, Shekha Mahara Bldg, Deira
Dubai
234024

Alerts

Be the first to know and let us send you an email when myMPFS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Dubai.