Amrishbhai R Patel
आमदार- धुळे-नंदुरबार विधानपरिषद
MLA | Maharashtra Legislative Council (Dhule–Nandurbar Local Authorities Constituency)
23/08/2026
🏫 ११६ वर्षांची गौरवशाली परंपरा… आधुनिक शिक्षणाची नवी दिशा!
॥ तमसो मा ज्योतिर्गमय ॥
शिरपूर वरवाडे नगर परिषद संचलित पीएमश्री पांडू बापू माळी म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर या ११६ वर्षांची गौरवशाली शैक्षणिक परंपरा लाभलेल्या विद्यालयात स्मार्ट क्लासरूम उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे सर यांनी सहचारिणीसह शिरपूरला भेट दिली. त्यांच्या शुभहस्ते विद्यालयातील अत्याधुनिक स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.
या सोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे वर्ग, संगणक सुविधा, प्रयोगशाळा व ग्रंथालयाची पाहणी करून त्यांनी आधुनिक शैक्षणिक सुविधांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रविंद्र विठ्ठलराव घुगे, उच्च न्यायालय, मुंबई, तसेच उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती, जिल्हा व सत्र न्यायाधीश, धुळे आणि विविध मान्यवरांची उपस्थिती
लाभली.
#शिरपूर #पांडूबापूमाळीविद्यालय Court System
#शिक्षण #डिजिटलशिक्षण #नवीनदिशानवेभविष्य
23/08/2026
भारतीय जनता पक्षातील आमचे सहकारी, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. मंगेशजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आपणांस निरामय आरोग्यासाठी अनेकानेक सदिच्छा !
Wishes Chavan #मंगेश_चव्हाण
23/08/2026
भारतीय जनता पार्टीचे धुळे ग्रामीण
विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. राघवेंद्रजी पाटील यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य आणि उज्वल भवितव्य लाभो, हीच सदिच्छा !
#राघवेंद्र_पाटील
18/08/2026
हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांच्या कार्याला भावपूर्ण नमन!
#वसंतरावनाईक
18/08/2026
भारताच्या विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री आदरणीय श्रीमती निर्मला सीतारामनजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
#निर्मलासितारामनजी
18/08/2026
नाशिक जिल्हा "पालकमंत्री पदी” आमचे नेते, महाराष्ट्र. राज्याचे जलसंपदा मंत्री
मा.श्री. गिरीषजी महाजन यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन !
18/08/2026
प्रखर देशभक्ती, अदम्य शौर्य आणि असामान्य पराक्रमाचे मूर्तिमंत प्रतीक, आझाद हिंद सेनेचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🇮🇳
#नेताजीसुभाषचंद्रबोस #पुण्यतिथी #देशभक्ती #शौर्य #जयहिंद
18/08/2026
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी नमन! 🙏🚩
#बाजीरावपेशवे #थोरलेबाजीराव
17/08/2026
जगणं प्रत्येकजण जगतो; पण लोकांच्या मनावर आणि हृदयावर कायमचं राज्य करणं, ही किमया फार थोड्या व्यक्तींना साध्य होते. तपनभाई मुकेशभाई पटेल हे त्यापैकीच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.
सिंहासारखा दरारा, मन जिंकणारं प्रेम आणि प्रत्येकाला आपलंसं करण्याची आपुलकी—या गुणांमुळे तपनभाई आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी सदैव जिवंत राहतील.
खरा राजा तोच, जो सिंहासनावर नव्हे तर लोकांच्या हृदयावर राज्य करतो… आणि तपनभाई, तुम्ही आजही असंख्य हृदयांवर राज्य करत आहात.
#तपनभाईपटेल
16/08/2026
🌺 खान्देशची आराध्यदैवत श्री कानबाई माता उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात खान्देशची लोकपरंपरा, श्रद्धा आणि मातीशी जोडलेली संस्कृती यांचे एक वेगळे स्थान आहे. या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविणारा कानबाई माता उत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती, एकजूट आणि आनंदाचा मंगलमय सोहळा!
कानबाई मातेच्या कृपाशीर्वादाने खान्देशातील प्रत्येक घरात सुख, समृद्धी, आरोग्य, शांती आणि आनंद नांदो. आपल्या संस्कृतीचा हा समृद्ध वारसा पुढील पिढ्यांपर्यंत असाच अभिमानाने जपला जावो, हीच मातेच्या चरणी प्रार्थना.
खान्देशच्या मातीत रुजलेल्या या पवित्र लोकपरंपरेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला नवी ओळख देणाऱ्या श्री कानबाई माता उत्सवानिमित्त सर्व माता-भगिनी, बांधव आणि भाविकांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!
🙏 जय कानबाई माता! 🚩
#कानबाईमाताउत्सव #खान्देश #खान्देशचीआराध्यदैवत #खान्देशचासांस्कृतिकवारसा #मंगलमयशुभेच्छा
Category
Telephone
Website
Address
Dhule
Alerts
Be the first to know and let us send you an email when Amrishbhai R Patel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.