Kunal Rohidas Patil
Ex. Member of Legislative Assembly - Dhule Rural Constituency, Maharashtra
वाढदिवस लोकहिताचा!
दुष्काळग्रस्तांसाठी एक हात मदतीचा..!
🤝 वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते श्री. ज्ञानेश्वर तात्या पाटील, कुंडाणे (वरखेडी) यांच्याकडून दुष्काळग्रस्तांसाठी आर्थिक मदत
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #दुष्काळग्रस्त #लोकसेवा
23/09/2026
गौ सेवा परमो धर्म:🚩
रोकडे हनुमान मंदिर, आर्वी येथील गोशाळेत माझ्या वाढदिवसानिमित्ताने चारा वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गोशाळेत जावून गोमातांचे पूजन करून प.पू. गुरुवर्य वासू बाबा यांच्या शुभहस्ते गोमातेस चारा वाटप करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी श्री. अरुण दादा पाटील (मा. जि.प. सदस्य, गरताड), श्री. बापूसाहेब देविदास माळी (मा.जि.प. सदस्य, रतनपुरा), श्री. कैलास आबा पाटील (मा. पं.स. सभापती, धुळे), श्री.आबासाहेब मधुकर माळी मोघण, श्री. आबासाहेब राजेंद्र पाटील (मा. सरपंच, धाडरी), मोघण येथील मा. सरपंच भास्कर पाटील, श्री. संजू महाराज, श्री. नंदू भाऊ पाखले, श्री. ज्ञानेश्वर जाधव, वाल्मिक गोपाळ, विनोद पाटील (पिंटू शेठ), श्री. सुभाष जाधव, कैलास जाधव, हमीद दादा पिंजारी, अनिल पाटील, देवा पाटील, चंदू पाटील, भूषण माळी, श्री. नागेश बापू देवरे (सरपंच, आर्वी), तिखी येथील मा. सरपंच सुशील पाटील, उपसरपंच रविंद्र पाटील (तिखी), कमलेश भामरे (तिखी), गोरक्षक समाधानभाऊ पाटील तरवाडे, श्री दिनेश माळी (मा. संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, धुळे), नाना भाऊ शिंदे (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, धुळे), तसेच धाडरे येथील श्री. सतीश पाटील, देविदास बछ्याव, दिनेश शिंदे (गरताड), मोहन गोपाळ (धाडरी), तसेच हेंढूण येथील सामाजिक कार्यकर्ते मंगा दादा राजपूत, किरण बापू, सुनील बापू, राहुल आबा, चंदू माळी, डिगा पाटील, भुरा पाटील, राकेश राजपूत, विकास राजपूत, प्रवीण ठाकरे, संभा राजपूत, नितीन राजपूत, सुनील सोनवणे, मुकेश देवरे (देऊर), जावेद पिंजारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री. अरुण दादा पाटील (मा. जि.प. सदस्य, गरताड), आबासाहेब मधुकर माळी (उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते, मोघण) आणि श्री. राजेंद्र उत्तम पाटील (सामाजिक कार्यकर्ते, मोघण) यांनी केले होते.
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #गोसेवा #सामाजिकसेवा
23/09/2026
वृक्षवल्ली आम्हा सोयरे...!🌱🌱🌱
वाढदिवस हा पर्यावरण संतुलन आणि रक्षणाचा संदेश देणारा ठरला. देवभाने ता.धुळे येथे माझ्या वाढदिवसानिमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावण्याबरोबरच झाडे जगविली गेली पाहिजेत, असा संदेश देण्यात आला. यावेळी देवभाने सरपंच श्री संजय देसले, उपसरपंच श्री चुडामण देसले, ज्येष्ठ नेते श्री अजबराव देसले, सामाजिक कार्यकर्ते पंडीत देसले, माजी सरपंच श्री प्रमोद देसले, श्री ज्ञानेश्वर मोरे, श्री जितेंद्र देसले, श्री शशिकांत देसले, श्री भानुदास सोनवणे, श्री विकास देसले, श्री स्वप्निल भामरे, पोलिस पाटील संदिप नागरे, सौ.ललिताताई देसले, श्री विशाल अकलाडे, प्रा.प्रविण साळुखे, श्री पंकज देसले यांच्यासह गावातील वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #वृक्षारोपण #पर्यावरणसंवर्धन
23/09/2026
मोहाडी उपनगर येथील सावली वृद्धाश्रमात माझ्या वाढदिवसानिमित्ताने स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला. स्वादिष्ट आणि रुचकर भोजनाने मन तृप्त होणे हेच सर्वात मोठे पुण्य असते. युवा नेते चि. रायबा दादा पाटील यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. या कार्यक्रमाला अवधानचे माजी उपसरपंच सुरेश भदाणे, मा. सरपंच अरुण भदाणे, ज्येष्ठ नेते श्री आप्पा खताळ, श्री आर्यन भदाणे, श्री प्रदीप भदाणे, श्री गोरख भदाणे, श्री संभाजी भदाणे, श्री वाल्मिक भदाणे, श्री दंगल भदाणे, श्री अभय खैरनार, श्री अमोल भदाणे, श्री सुनील जाधव, श्री कमलेश पाटील, श्री दत्तात्रय देवरे, श्री पंडित गर्दे, श्री रविंद्र वाघ, श्री सोपान भदाणे, श्री नाना टेलर, श्री दिनेश पाल, श्री ज्ञानेश्वर भदाणे, श्री नितीन जाधव, श्री रोहित भदाणे, श्री पवन बागुल, श्री राज भदाणे, श्री पंढरीनाथ भदाणे, श्री जालिंदर भदाणे, श्री धनंजय भदाणे, श्री हरीष भदाणे यांच्यासह तरुण कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्नेहभोजनाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला.
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #अन्नदान #स्नेहभोजन
23/09/2026
वाढदिवस... लोकसेवेचा
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील युवकांनी माझ्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रम राबविले. प्र. रघुनाथ केले वाक्-श्रवण विकास विद्यालय, धुळे येथील विद्यार्थ्यांना युवा नेते चि. रायबा दादा पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. कमलेश पाटील जुनवणे, हिमांशू अहिरे फागणे, भूपेंद्र पाटील वणी, हरपालसिंग गिरासे, बोरीस, ऋषीकेश पाटील मोराणे, मनोज पाटील नावरा तसेच धुळे तालुक्यातील रायबा दादा मित्र परिवाराने कार्यक्रम आयोजित केला होता. शैक्षणिक साहित्य वाटपाने विद्यार्थ्यांना निश्चितच प्रोत्साहन मिळणार असून आयोजक युवकांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #शैक्षणिकसाहित्य #लोकसेवा
23/09/2026
वाढदिवस सेवाभावाचा... संकल्प लोहिताचा...!
वाढदिवस हा लोककल्याणकारी आणि लोकसेवेचा असावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री योगेश पाटील आणि त्यांच्या सर्व संचालकांनी माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताहाचे आयोजन केले. त्याबद्दल सर्व पदाधिकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
रोकडे हुनमान मंदिर आर्वी येथे आरती व महाप्रसाद वाटप, बाजार समिती धुळेच्या आवारात वृक्षारोपण, शेतकर्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्हीचे लोकार्पण, शेतकर्यांच्या पशुधनाला मोफत लसीकरण, महास्वच्छता दिन, महारक्तदान शिबीर, श्री दत्त मंदिराचे जीर्णोध्दार-महाआरती असे लोकहिताचे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना धुळे शहर व जिल्ह्यातील मान्यवरांनी उपस्थित राहून वाढदिवसाचा आनंद व्दिगुणीत केला, त्याबद्दल मान्यवरांचेही आभार व्यक्त करतो.
लोकहितासाठी तत्पर आणि जनहितासाठी समर्पित असलेले कार्यक्रम आयोजित केल्याने वाढदिवस अविस्मरणीय ठरला.
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #लोकसेवा #जनहित
23/09/2026
एका जनार्दनी संतसेवा जाण। घडती कोटी यज्ञ स्मरणमात्रे l🚩
माझ्या वाढदिवसानिमित्ताने धुळे येथील गोंदूर विमानतळ रोडजवळील संत ज्ञानेश्वर माऊली पाठशाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. चि. रायबा दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला नगरसेवक श्री.रंगनाथ ठाकरे,नगरसेविका वंदनाताई भामरे, मा. नगरसेवक श्री गोपीचंद देवरे, मा. सरपंच भोकर श्री. मंगलदास देवरे, मा.वलवाडी सरपंच, श्री. मुकेशभाऊ खरात, मा. सरपंच श्री. चुणीलाल देवरे, मा. सरपंच वलवाडी श्री. प्रविणभाऊ पाटील, नकाने मा.सरपंच श्री.अनिल पाटील,सामाजिक कार्यकर्ते पैलवान श्री कल्याणभाऊ गरुड, सामाजिक कार्यकर्ते श्री. सतिश बागुल,सामाजिक कार्यकर्ते श्री.अनिल चित्ते, श्री.दिलीपजी रणधीर,सामाजिक कार्यकर्ते श्री. सजन चौधरी, प्रा.श्री.पी. एम. पाटील, निकम इन्स्टिट्यूटचे चिं. रोहित रविंद्रज निकम,सामाजिक कार्यकर्ते श्री मयुर देवरे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री.आकाश रविंद्र पाटील,जिल्हा उपाध्यक्ष,भाजपा युवा मोर्चा धुळे शहर यांनी केले होते.
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #शैक्षणिकसाहित्यवाटप #विद्यार्थीसेवा
वाढदिवस सेवा सप्ताह
🩸 रक्तदान शिबिर
📍आयोजक–बाजार समिती, धुळे
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #रक्तदान #सामाजिककार्य
22/09/2026
जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करावा
मुख्यमंत्री महोदयांना निवेदन
धुळे तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळाचे भीषण सावट आहे. गेल्या दोन महिन्यापासून पावसाने पाठ फीरविल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप पिकाचा घास दुष्काळाने हिरावून घेतला. शेतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे धुळे तालुक्यात आणि जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करीत तातडीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदत जाहिर करुन शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली. दुष् काळ जाहिर करावा या मागणीसाठी आज मुख्यमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी धुळे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील दुष्काळाची माहिती देत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले.
तसेच मुकटी ता.धुळे येथे 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करावे आणि नेर ता.धुळे येथील ग्रामीण 30 खाटांचे रुग्णालया विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन प्रस्तावास मंजूरी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
धुळे जिल्हा दुष्काळी जाहिर करावा या मागणीसाठी मागील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची भेट घेतली होती. आज पुन्हा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेत निवेदन देवून दुष्काळ व शेतकर्यांना आर्थिक मदत जाहिर करण्याची मागणी केली. यावेळी धुळे तालुका व जिल्ह्यातील दुष्काळाची असलेली परिस्थीती आणि शेतकर्यांची कैफीयत मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. धुळे जिल्ह्यातील आणि राज्यातील दुष्काळाच्या छायेत असलेल्या शेतकर्यांना वार्यावर सोडले जाणार नाही.शेतकर्यांच्या प्रत्येक संकटात भाजपा महायुती सरकार पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही शेतकर्यांच्या मदतीसाठी सर्वात पुढे उभे राहिल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे धुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील शेतकर्यांनी धीर सोडू नये माझ्यासह भाजपा महायुती सरकार आपल्या पाठीशी असून शेतकर्यांच्या मदतीसाठी मी सदैव तत्पर आहे.
#धुळेग्रामीण #दुष्काळ #शेतकरी #शेतकरीहित #महाराष्ट्र
22/09/2026
...आणि चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!
📍वडजाई ता.धुळे
सामाजिक बांधिलकी जपत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर शिक्षणाचा आनंद फुलविण्याचे कार्य केले पाहिजे. शिक्षणाची खरी गरज असलेल्या घटकांना वडजाई ता.धुळे माझ्या वाढदिवसाला रिअल इंडो ग्लोबल व्हिजन गुरुकुल फाउंडेशन, धुळेतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्ष डॉ.संभाजी पाटील, डॉ.दिपक पाटील, श्री प्रतिक माने, श्री हर्षल वाघ, उपसरपंच श्री महेंद्र सुर्यवंशी, श्रीमती छायाताई सुर्यवंशी, श्री पिरण सुर्यवंशी, श्री सतिष सुर्यवंशी, श्री प्रभाकर सुर्यवंशी, श्री गुलाब सुर्यवंशी, श्री महेंद्र सुर्यवंशी, श्री रतिलाल सुर्यवंशी, श्री चंद्रशेखर सुर्यवंशी, श्री विजय पाटील, श्री मदन पाटील, श्री प्रकाश पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
#वाढदिवस #सेवासप्ताह #धुळेग्रामीण #शैक्षणिकसाहित्यवाटप #विद्यार्थी
Category
Contact the public figure
Telephone
Address
Dhule
424002
Alerts
Be the first to know and let us send you an email when Kunal Rohidas Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.