Ajit Patil
शिवसेना जिल्हा उप-प्रमुख
18/09/2026
सुवर्ण पावलांनी घरी आलेल्या गौरी मातांचे मनःपूर्वक स्वागत!
गौरी आगमनाच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आई गौरीच्या कृपाशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो, हीच प्रार्थना…!
17/09/2026
भारताच्या विकासाचा संकल्प, देशसेवेची अखंड प्रेरणा आणि जनतेशी जोडलेले नेतृत्व माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🇮🇳
ईश्वर त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशसेवेची निरंतर ऊर्जा देवो, हीच सदिच्छा…!
14/09/2026
श्री गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त श्री गणरायाच्या चरणी मनःपूर्वक वंदन!
गणरायाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य व यश नांदो, हीच प्रार्थना..!
गणपती बाप्पा मोरया!
आपणास व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!
07/09/2026
आमचे सहकारी, शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख श्री.विजय बलुगडे यांचा वाढदिवस शिवसेना कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री.अर्जुन आबिटकर सर उपस्थित होते.
05/09/2026
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार स्वर्गीय गोविंदरावजी कलिकते साहेब यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त शिरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
साहेबांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदान आणि विचार सदैव प्रेरणादायी राहतील. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
05/09/2026
भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!
ज्ञान, संस्कार आणि मूल्यांची शिदोरी देत राष्ट्राच्या भावी पिढीची जडणघडण करणाऱ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
04/09/2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील सत्य, धर्म आणि कर्मयोगाची शिकवण आपल्या जीवनाला सदैव प्रेरणा देत राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
जय श्रीकृष्ण!
29/08/2026
कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर स्व.प्रल्हादभाऊ चव्हाण यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आयोजित जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
स्वर्गीय प्रल्हादभाऊ चव्हाण यांनी सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनात केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत, समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होणे हीच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली आहे.
याप्रसंगी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साहेब, आमदार जयंतजी आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, माजी महापौर सागरभाई चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती सचिनभाई चव्हाण यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व अन्य मान्यवर उपस्थित होते.
29/08/2026
भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देणारे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांच्या अद्वितीय खेळकौशल्याला आणि देशासाठीच्या योगदानाला मनःपूर्वक सलाम.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Category
Website
Address
Kolhapur
Alerts
Be the first to know and let us send you an email when Ajit Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.