RC Fan Club

RC Fan Club

Share

आमचा दादा रवि दादा ....!

17/09/2026

भारताच्या नव्या युगाचे शिल्पकार, आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Photos from RC Fan Club's post 13/09/2026

चाहूल नवरात्रीची, लगबग डोंबिवलीची! ✨

‘महाराष्ट्रातील सर्वात मोठा गरबा फेस्टिवल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘नमो रमो नवरात्री उत्सव २०२६’ची तयारी सुरू झाली आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते भूमिपूजनाने उत्सवाच्या तयारीचा शुभारंभ झाला.

आता प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांचीच!
आईच्या भक्तीने पुन्हा सजणार नवरात्री…✨
पुन्हा रंगणार आपला लाडका ‘नमो रमो नवरात्री उत्सव’ ! ❤️

जय माता दी! 🙏



[Namo Ramo Navratri, Namo Ramo Navratri 2026, Navratri 2026, Garba Festival, Dombivli Navratri, Dombivli Garba, Ravindra Chavan, Maharashtra Navratri, Navratri Celebration, Gajawaja]

11/09/2026

Hii
गणेशभक्तांचा प्रवास अधिक किफायतशीर व्हावा यासाठी आपल्या भाजपा-महायुती सरकारने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफी जाहीर केली आहे.,

खाली दिलेल्या लिंकवर ‘गणेशोत्सव २०२६ – कोकण दर्शन’ पास उपलब्ध आहे. पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये भेट देऊन हा पास स्टॅम्प करून घ्यावा!

https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609081707590418.pdf?fbclid=IwcGRvZgVleHRuA2FlbQIxMABicmlkETFrem94dms1dmYyUHFSWFZrc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHnhxqErfGVuVxZnZc9TOnk0YfCxFD3YkmxVZVpXlkjvcLOraGxTXgnR1GqH9_aem_9qzLyHgltGhPpEflYzQK-Q

*Facebook* :- https://www.facebook.com/share/p/1CHU9yYYaw/

*Instagram* :- https://www.instagram.com/p/DdDnm_YDlWS/

https://ravindrachavan.in/

Thank you for your enquiry. We appreciate your interest and hope the information shared above is helpful to you.

Photos from RC Fan Club's post 06/09/2026

उत्सव डोंबिवलीच्या मानबिंदूचा, गोविंदांच्या एकोप्याचा
विकसित भारताच्या ध्येयाचा, राष्ट्रनिर्माणाच्या तपपूर्तीचा !

गोविंदांच्या एकोप्याने आणि उत्साहाने ‘डोंबिवलीचा मानबिंदू’ असलेला दहीहंडी उत्सव यंदा अविस्मरणीय ठरला. अनेक गोविंदा पथकांच्या उत्स्फूर्त सहभागाने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न झाला. डोंबिवलीसह आसपासच्या परिसरातील गोविंदा पथकांनी एकजुटीची ताकद दाखवत थरावर थर रचले आणि आपल्या दहीहंडीला दिमाखात सलामी दिली.

आपल्या सांस्कृतिक डोंबिवली नगरीची ओळख असलेली व ‘डोंबिवलीचा मानबिंदू’ म्हणून नावारूपास आलेली दहीहंडी फोडण्यासाठी अष्टविनायक गोविंदा पथक, नवयुग गोविंदा पथक आणि नवसाई गोविंदा पथक या पथकांमध्ये लॉटरी काढण्यात आली. या लॉटरीद्वारे हंडी फोडण्याचा मान नवयुग गोविंदा पथकाला मिळाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन या तिन्ही गोविंदा पथकांचा सन्मान केला.

उत्सवादरम्यान गोविंदांच्या थरांकडे पाहताना त्यामागची मेहनत, सराव, एकमेकांवरील विश्वास आणि त्यांचा एकोपा प्रकर्षाने जाणवत होता. गोविंदांनी रचलेला प्रत्येक थर हा त्यांच्या जिद्दीचा व एकजुटीचा साक्षीदार असतो. त्यांची हीच जिद्द आणि एकजूट दहीहंडी उत्सवाला समृद्ध करतात.

आपल्या भारताचे सामर्थ्य हे एकजुटीत आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला एकजुटीच्या धाग्यात बांधून ठेवणारी हीच भावना भारताच्या प्रगतीची खरी शक्ती आहे. याच एकतेने आपण सर्वजण ‘विकसित भारताच्या’ स्वप्नपूर्तीसाठी योगदान देऊया आणि भारताला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जाऊया!

#राष्ट्र_निर्माणाची_तपपूर्ती

01/09/2026

याला म्हणतात आपल ठेवायच झाकून आणि लोकांच बघायच वाकून.
राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत का ? जरा मंद सैनिकांनी सांगावे किंवा अमित ठाकरे यांना जाऊन विचारावे !

25/08/2026

शहराचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून तयार झालेल्या ज्या शेडच्या आडोश्यात हि मुले भर पावसात सुद्धा आपला सराव करतात त्या शेड विरोधात सुद्धा काही जण राजकारण करतात.

Photos from RC Fan Club's post 24/08/2026

🪷 भाजपा पक्षप्रवेश सोहळा, रायगड जिल्हा 🪷

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ या ध्येयाला साथ देण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष पंकज तांबे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक माजी सरपंचांनी व कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

📌 पक्षप्रवेश करणारे मान्यवर -
निजामपूरचे स्वप्नील शिर्के, वावे दिवालीचे माजी सरपंच शरद कदम, निलजचे माजी सरपंच प्रमोद जाधव, शिखलीचे माजी सरपंच विजय नलावडे, सयाजी नलावडे, ॲड. रुपेश वाढवळ, अनंत मोरे, गजानन चव्हाण, प्रकाश शिंदे, प्रताप कडू, समीर म्हसकर आदी असंख्य कार्यकर्ते.

📌 उपस्थित मान्यवर -
आ. प्रवीण दरेकर, निजामपूर मंडल अध्यक्ष युवराज मुंढे, सरचिटणीस निलेश राशीनकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मंदार महामुनकर,गोविंद कासार, बापुसाहेब सोनगिरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आदी.

भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !

[ Paksh Pravesh, Welcome, Viksit Bharat, Viksit Maharashtra, Raigad District, BJP4Raigad, BJP4Maharashtra, RavindraChavan4MahaBJP ]

24/08/2026

हा बंध प्रेमाचा, विश्वासाचा, आपुलकीचा… ❤️

आम्हा कल्याण-डोंबिवलीकर भगिनींच्या प्रत्येक सुख-दुःखात सोबत असणारे, प्रत्येक अडी-अडचणीत मदतीला तत्पर असणारे आमचे लाडके रविदादा!

रविदादांसोबतचे हे ऋणानुबंध आणखी वृद्धिंगत व्हावेत, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या रविदादांसोबत रक्षाबंधनाचा कौटुंबिक सोहळा साजरा करत आहोत.

🗓️ शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट २०२६

🕚 वेळ : सकाळी ११ वाजता
📍 स्थळ : जनसंपर्क कार्यालय, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, सावरकर रोड, डोंबिवली पूर्व

🕒 वेळ : दुपारी ३ वाजता
📍 स्थळ : जनसंपर्क कार्यालय, सम्राट हॉटेल जवळ, नाना शंकरशेठ रोड, डोंबिवली पश्चिम

भगिनींनो, या आपुलकीच्या सोहळ्याला नक्की या!

आपल्या लाडक्या रविदादांना राखी बांधूया,
आपुलकीचा स्नेहबंध जपूया! ❤️

Website

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when RC Fan Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Mumbai.