PustakNaka

PustakNaka

Share

जिथं ट्रॅफिक वाचकांचं!

30/09/2026

शिवराय 🌿



Bookstagram,books,pustak,marathi, marathi pustak, Shivaji Maharaj, shivray books

29/09/2026

येत्या सात तारखेला या ऑनलाइन संवादात नक्की सहभागी व्हा!

💚

29/09/2026

💚🤍

27/09/2026

तात्या 🌱

25/09/2026

अण्णा

आपल्या सक्षम खांद्यांवर लेकरं घेऊन चालणारा बहुजनांच्या शिक्षणाचा वाटसरू.

पोरांना शिक्षणाचा अर्थ नोकरी, भाकरी, चाकरी आणि छोकरी असा चाकोरीबद्ध न शिकवता स्पष्टपणे “शिक्षण म्हणजे बंडखोरीची कुऱ्हाड” असं सांगतो आणि परिवर्तनशील इच्छांची बाळंतपणं होतात.

औदुंबर, सज्जनगडासारख्या ठिकाणच्या जातवार पंगती उठतात.
शिक्षणातून विद्रोहाच्या धगधगत्या मशाली जन्माला येतात.
अनेकदा कर्मठ सोकावतात, प्रवृत्ती फोफावतात; पण आण्णांनी घडवलेले रयतसेवक हटत नाहीत, झटत राहतात.

मुळातच आण्णांचं चरित्र किंमतीपेक्षा मूल्यांची, नीतीमान विवेकनिष्ठ शिकवण देतं. त्यामुळेच रयतेसाठी स्वतःला अजन्म वाहण्याची शपथ घेणारी संवेदनशील व्यक्तिमत्त्वं तयार होतात.

खडीच्या एका दगडाला डॉलर म्हणणारे अण्णा. भाकरीच्या तुकड्याला पेढा मानणारे अण्णा. जगण्याला मूल्यांची सांगड घालून देणारे अण्णा.

श्रमाला प्रतिष्ठा आणि घामाला महत्त्व देणाऱ्या आण्णांकडून घ्यावी ती मूल्येच!

अण्णांनी नेमकं काय केलं?

खांद्यावर घेतलेल्या पोरांचे खांदे पुढल्या खेडोपाड्यातल्या पोरांना खांद्यावर घेऊन समाज सुशिक्षित करण्यासाठी सक्षम केले.

माना आणि पाठीचा कणा ताठ राहावा यासाठी स्वाभिमान रुजवणारं रसायन दिलं.

खरंतर, “विष शोषून घेईल आणि मानवतेच्या अमृताचे अंश खोलवर कायम ठेवील अशी भक्कम वाट आपल्याला देणारा कर्मयोगी पुन्हा घडणे नाही.” असं म्हणून आपण त्यांच्या कार्याविषयी फक्त बोलून अथवा लिहून मोकळं होणं ही केवळ एक औपचारिकता होईल.

“कर्मवीर”...या प्रेरणेतील “विवेकनिष्ठ कर्म” प्रत्येकाच्या हातून घडू शकतं. फक्त गरज आहे ती अभिलाषाविरहित खांदा वाहण्याची प्रबळ इच्छा होण्याची.

आणि ते काम समाजात आजही अनेक खांब मनापासून करतायत, ही सकारात्मक बाब काहीतरी धडपड करण्यासाठी प्रेरणा देते.

अंधश्रद्धा आणि रूढींच्या झोपडीआड अण्णांच्या खांद्याची गरज असलेल्या लेकरांपर्यंत पोहोचणं, कर्मवीरांची पाऊलवाट

बाकी काय?

जीवनातला तिमिर जावा,
प्रबोधनाची पहाट व्हावी...🌿

25/09/2026

तुम्ही वाचली आहेत का ही पुस्तकं?

Pustak,books,book review,marathi pustak, marathi books, maharashtra, pustaknaka

22/09/2026

#पुस्तक

14/09/2026

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when PustakNaka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.