Amar Awale

Amar Awale

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amar Awale, Politician, Navi Peth, Pune.

• नगरसेवक, पुणे महानगरपालिका
• सदस्य - क्रीडा समिती, पुणे मनपा
• मा.उपाध्यक्ष – भाजपा युवा मोर्चा, पुणे शहर
• स्वयंसेवक #rssorg_official
• राष्ट्रभक्त | तत्त्वनिष्ठ | सेवाप्रवृत्ती

22/09/2026

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षणतज्ञ, पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

#कर्मवीर_भाऊराव_पाटील #जयंती #विनम्र_अभिवादन

Photos from Amar Awale's post 21/09/2026

गणरायाच्या चरणी भक्तिभाव… साने गुरुजी तरुण मंडळास मान्यवरांची भेट!

गणेशोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मा. पंकजाताई मुंडे तसेच महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री व पर्वती विधानसभा आमदार मा. माधुरीताई मिसाळ यांनी साने गुरुजी तरुण मंडळास भेट दिली. यावेळी श्री गणरायाची आरती करून बाप्पाचे दर्शन घेतले आणि उपस्थितांशी संवाद साधला.

मंडळाच्या वतीने अध्यक्ष व भाजपा पुणे शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी साने गुरुजी तरुण मंडळाने साकारलेल्या ‘श्री रामेश्वर मंदिरा’च्या भव्य प्रतिकृतीची त्यांनी पाहणी केली.

या प्रसंगी नगरसेविका स्वरदा बापट, श्री. करण मिसाळ, नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील गणेशभक्त उपस्थित होते.

श्री गणरायाच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो, हीच प्रार्थना! 🙏

अमर आवळे
कार्याध्यक्ष, साने गुरुजी तरुण मंडळ
नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य, पुणे मनपा

#साने_गुरुजी_तरुण_मंडळ #गणेशोत्सव #गणपती_बाप्पा_मोरया

Photos from Amar Awale's post 20/09/2026

श्री गणरायाच्या दर्शनासाठी पुणे मनपा आयुक्त श्री. नवल किशोर राम यांची साने गुरुजी तरुण मंडळास सहकुटुंब भेट!

पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी सहकुटुंब साने गुरुजी तरुण मंडळास भेट देऊन श्री गणरायाची आरती केली व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने साने गुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष, भाजपा पुणे शहराध्यक्ष श्री. धीरजजी घाटे यांनी त्यांचे स्वागत केले.

मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचीही माहिती यावेळी देण्यात आली. आयुक्तांनी मंडळाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

यावेळी मंडळाचे पदाधिकारी तसेच पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

अमर आवळे
कार्याध्यक्ष, साने गुरुजी तरुण मंडळ
नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य, पुणे मनपा

#साने_गुरुजी_तरुण_मंडळ #गणेशोत्सव #श्रीरामेश्वरममंदिर #पुणे #धीरजघाटे अमरआवळे

20/09/2026

II जिवेत् शरद: शतम् II 🪷

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, आमचे मार्गदर्शक नेते, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार श्री. रवींद्रजी चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपणास सुखी-निरामय दीर्घायुष्य, उत्तम आयुरारोग्य आणि यशस्वी सार्वजनिक जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

#भाजप_प्रदेशाध्यक्ष
Ravindra Chavan

Photos from Amar Awale's post 19/09/2026

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!”

घरच्या गणपती बाप्पाची आज भक्तिभावाने पूजा-अर्चा करून विसर्जन केले. बाप्पाच्या आगमनाने घरात निर्माण झालेला भक्तीचा आणि मंगलमय वातावरणाचा अनुभव मनात कायम राहील.

बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना एकच प्रार्थना — आपल्या कृपाशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो.
पुढील वर्षी पुन्हा त्याच भक्तिभावाने आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्याची संधी मिळो.

अमर आवळे
नगरसेवक, क्रीडा समिती सदस्य, पुणे मनपा
#गणपती_बाप्पा_मोरया #पुढच्या_वर्षी_लवकर_या #गणेशोत्सव

19/09/2026

भोले के भक्त!!
भोले के भक्ती में दंग!!!

Category

Website

Address

Navi Peth
Pune
411030