Ashish Bhosale
सर्वांसाठी�.....सर्वकाही�
25/07/2026
गेल्या महिन्याभरापासून जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरु असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात एखाद्या आंदोलनानंतर किंवा आरोपांनंतर केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- आशिष भोसले
फक्त माहिती असलेले किंवा फक्त (कोणालातरी) अंधानुकरण करणारे दोन्हीही घातकच ठरतात. कुठलीही गोष्ट समजून उमजून आचारणात आणणारे जवाबदारीने वागतात आणि जास्त विश्वासार्ह असतात.
-आशिष भोसले
18/07/2026
कालपर्यंत उपोषण करण्याचा अधिकार आहे म्हणणार्यांनी
आज सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने का पकडून नेलयं
-आशिष भोसले
मराठी चित्रपट क्षेत्राशी निगडित असलेल्या आणखी एका दांपत्याच्या घटस्फोटाची बातमी काल रात्री उशिरा सगळीकडे पसरली.काही लोकांनी ती वाचली पण असेल. असो...
ह्यांच्या घटस्फोटाचं खरं कारण त्यांनी सांगितले नाहीये आणि आपल्यालाही त्यात पडण्याचं काही कारण नाहीये.ह्या जोडप्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आणि निर्णयाचा संपूर्ण आदर मला आहे पण जे चाललंय त्याबद्दल माझं एक निरिक्षण खाली देतोय.
हा सध्याच्या समाज जीवनात पडत असलेला नवीन पायंडा (शुद्ध मराठीत- नवीन ट्रेंड) आहे.१५-२० वर्ष केलेले संसार (मुलं- बाळ असताना) मोडायचे.... का तर ह्यांच्या नात्यात तो स्पार्क नाही राहिला किंवा तिसरा माणूस(कधीकधी चौथापण- कारण एकाचवेळी दोघेही सारखीच कृती करताना आढळतात) ह्यांच्या आयुष्यात आलेला असतो.
असं सगळं करताना हे लोक सोबत घालवलेली वर्षे, त्यातले चांगले- वाईट प्रसंग विसरू कसे शकतात आणि जसे ते दिवस गेले तसे हे पण जातील यावरचा विश्वास कसा काय हरवून बसतात.अचानक किंवा अलिकडेच आलेला नवीन व्यक्ती इतका महत्त्वाचा कसा काय होतो. जो तुमच्या आयुष्यात शारीरिक,मानसिक आणि बर्याचदा आर्थिक अंगाने व्यापलेल्या तुमच्या जोडीदाराची जागा घेतो. असं काय झालेलं असतं की आपण आपलं माणूस जपलं पाहिजे हे विसरून नवीन आलेल्या व्यक्तीला प्राधान्य द्यायला लागतो.
अशा गोष्टी करताना सामाजिक किंवा सार्वजनिक आयुष्यात वावरणाऱ्या लोकांनी (नेते, अभिनेते, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित व्यक्ती) भान ठेवायला नको का?
कारण तुम्हांला पाहणारा,तुमची स्तुती करणारा, तुमचं अनुकरण करणारा जनसमुह आहे. तुमची उदाहरणं घेऊन समाजात चुकीचे पायंडे, प्रथा पडण्याची शक्यता जास्त असते. ह्याची जबाबदारी कोण घेणार?
टीप - परत एकदा नमूद करतो.ह्या लेखात सदर जोडपं किंवा इतर कोणत्याही जोडप्याची बदनामी करण्याचा अजिबात हेतू नाही
-आशिष भोसले
20/05/2026
भाजपमध्ये एक से बढ़कर एक नेते आहेत #bjp #pmc #pcmc #pune #pimprichinchwad #police Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
13/05/2026
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Alerts
Be the first to know and let us send you an email when Ashish Bhosale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.