Kinkar polytechnic seloo
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kinkar polytechnic seloo, Houston, TX.
07/29/2026
02/18/2026
किनकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी सेलू,येथे दिनांक 17 व 18 फेब्रुवारी 2026 रोजी दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, क्रिकेट आणि बॅडमिंटन या स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता.
या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दोन दिवस चाललेल्या या क्रीडा स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडल्या. खेळाडूंनी उत्कृष्ट क्रीडाभावना, संघभावना आणि कौशल्याचे प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत रेवतकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. क्रीडा शिक्षक प्रा. मयूर उमाटे यांनी संपूर्ण स्पर्धेचे नियोजन व यशस्वी आयोजन केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शाखांचे विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
02/06/2026
किनकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सेलू येथे बॅच २०२४–२५ साठी अल्युमनी मीट संपन्न
सेलू येथील किनकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शैक्षणिक वर्ष २०२४–२५ च्या विद्यार्थ्यांसाठी अल्युमनी मीट कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करणे तसेच सध्याच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवांतून मार्गदर्शन मिळावे हा होता.
या कार्यक्रमासाठी डॉ. प्रशांत रेवतकर, प्राचार्य, किनकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे यश, संस्थेतील त्यांचे योगदान आणि सध्याच्या विद्यार्थ्यांनी करिअर घडवताना घ्यावयाची दिशा याबाबत मार्गदर्शन केले.
या अल्युमनी मीटमध्ये संस्थेचे श्री. राजू देशमुख सर आणि श्री. दीपक धोडरे सर हे विशेष अल्युमनी सदस्य म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाला संस्थेतील सर्व विभागप्रमुख तसेच प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. सर्वांनी मिळून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित अल्युमनी सदस्यांचा सत्कार करण्यात आला व आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
01/28/2026
01/20/2026
संतवाणी उपक्रमातून स्वच्छता व समाजजागृतीचा संदेश
स्वच्छता म्हणजेच ईश्वराची सेवा आहे.” — या संत शिरोमणी केजाजी महाराजांच्या विचारांना अनुसरून किनकर पॉलिटेक्निक कॉलेज, सेलू यांच्या वतीने दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी समाजसेवेच्या उद्देशाने एक विशेष स्वच्छता व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम श्री संत शिरोमणी केजाजी महाराज यांच्या परिसरात उत्साहात पार पडला.
या उपक्रमाला डॉ. पी. एम. रेवतकर, प्रा. ए. जी. खराबे, प्रा. पी. व्ही. सोनी, प्रा. अनिल पडघणे व प्रा. सचिन शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत परिसर स्वच्छता, स्वच्छतेचे महत्त्व सांगणारे संदेश व जनजागृती उपक्रम राबविले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, भक्तिभाव व सेवा वृत्ती दिसून आली. समाजातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी सकारात्मक संदेश पोहोचविण्यात हा उपक्रम यशस्वी ठरला. संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Click here to claim your Sponsored Listing.
Telephone
Website
Address
Alerts
Be the first to know and let us send you an email when Kinkar polytechnic seloo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.