YC KMC College Library
learning
19/08/2026
*"क्रोशे राखी मेकिंग वर्कशॉप" व "राखी पोस्ट अभियानाचा" अहवाल*
यशवंतराव चव्हाण के. एम. सी. महाविद्यालयातील वाणिज्य विभाग व महिला सचेतना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी विद्यार्थिनींसाठी ‘क्रोशे राखी मेकिंग वर्कशॉप’ आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या उद्घाटनपर मार्गदर्शनाने झाली. प्राचार्यांनी विद्यार्थिनींनी अशा कौशल्याधारित, सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. शुभांगी पाटील यांनी विद्यार्थिनींना क्रोशेच्या साहाय्याने आकर्षक व सुबक राखी तयार करण्याचे कौशल्य प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शिकविले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वतःच्या कल्पकतेचा वापर करून विविध प्रकारच्या सुंदर राख्या तयार केल्या.
या उपक्रमास भारतीय डाक विभागाच्या ‘राखी अभियान’ उपक्रमाची जोड देण्यात आली. भारतीय डाक विभागाच्या वतीने महाविद्यालयाला प्राप्त झालेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थिनींनी कार्यशाळेत तयार केलेल्या राख्या आपल्या भावांना पोस्टाद्वारे पाठविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या राख्या राखी कव्हर/लिफाफ्यामध्ये व्यवस्थित पॅक करून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून स्पीड पोस्टने आपल्या भावांना पाठवल्या. स्वतः तयार केलेली राखी आपल्या भावापर्यंत पोस्टाद्वारे पोहोचविण्याचा हा अनुभव विद्यार्थिनींसाठी आनंददायी आणि भावनिक ठरला. पारंपरिक रक्षाबंधनाच्या सणाला सर्जनशीलता, कौशल्यविकास आणि आधुनिक टपाल सेवेची जोड देणारा हा अभिनव उपक्रम ठरला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला, कलागुणांना आणि आत्मविश्वासाला चालना मिळाली. तसेच विद्यार्थिनींमध्ये स्वावलंबन, कौटुंबिक मूल्ये, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होण्यास मदत झाली. महिला सचेतना समिती आणि वाणिज्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘क्रोशे राखी मेकिंग वर्कशॉप व राखी पोस्ट अभियान’ विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अत्यंत यशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमन लोहार यांनी केले. डॉ. बी. एम. पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश आणि उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. पूजा खोपकर यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे जूनियर विभागाचे पर्यवेक्षक डॉक्टर अमित रेडेकर, ग्रंथपाल आर. आर. मांगले, डॉ. संजय कांबळे, डॉ. जे. एम. शिवणकर, प्रा. महेश डांगे, प्रा. कोल्हापुरे, प्रा. जाधव, डॉ. वनिता शिंदे, डॉ.अश्विनी पाटील प्रा. सुमन कांबळे, प्रा. कुमुदिनी देसाई, प्रा. मयुरी तिकोडे, प्रा. प्रतिभा पाटील, डॉ. छाया माळी, प्रा. अस्मिता लवेकर, प्रा. अमृता शिंदे, प्रा. मोरसकर तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास शैक्षणिक व उत्साहपूर्ण वातावरण लाभले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
17/08/2026
दैनिक तरुण भारत दिनांक.17/08/2026
14/08/2026
*यशवंतराव चव्हाण (के. एम. सी.) महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.*
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी.) महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रीय एकात्मता व तिरंग्याविषयी अभिमान निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेचा उद्देश होता.
या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक व संदेशपर रांगोळ्यांच्या माध्यमातून देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि तिरंग्याचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
स्पर्धेतील विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक कुमारी वैष्णवी तामचीकर (बी.ए. भाग १) हिने मिळविला. द्वितीय क्रमांक विदिशा कांबळे (बारावी कला) हिने, तर तृतीय क्रमांक श्रद्धा मस्के (बारावी वाणिज्य) हिने प्राप्त केला. उत्तेजनार्थ विजेते म्हणून दिव्या बोडेकर आणि स्नेहल घाडगे यांची निवड करण्यात आली आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल आर. आर. मांगले, डॉ. बी. एम. पाटील, डॉ. सचिन धुर्वे, डॉ. संजय कांबळे, डॉ. जे. एम. शिवणकर, प्रा. महेश डांगे, डॉ. वनिता शिंदे, प्रा. मयुरी तिकोडे, डॉ. छाया माळी, डॉ. अश्विनी पाटील, प्रा. पूजा खोपकर, प्रा. सुमन कांबळे, प्रा. सुमन लोहार, प्रा.अमृता शिंदे तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते.
अशा प्रकारे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत आयोजित रांगोळी स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली.
14/08/2026
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न : Awaj India
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न : Awaj India ,
14/08/2026
दैनिक तरुण भारत दिनांक.14/08/2026
13/08/2026
13/08/2026
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर:
यशवंतराव चव्हाण ( के एम सी) कॉलेज, भूगोल विभाग,
च्या वतीने एल निनो आणि मान्सून या विषयांवर भित्तीपत्रकाचे आणि आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळेचे आयोजन दि 13 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आले. प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर यांच्या हस्ते भितीपत्रकाचे उद्घाटन झाले. डॉ प्रशांत
नागावकर यांनी संशोधन महत्त्वाचे असून विविध विषयांवर संशोधन प्रकल्प करावेत असे आवाहन या निमित्ताने केले. भूगोल विभाग प्रमुख डाॅ. जे. एम. शिवणकर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व भूगोल विभागातील उपक्रमाची माहिती दिली. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. युवराज मोटे यांनी आविष्कार संशोधन प्रकल्प , विषय निवड यांची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत प्रा. एस एम शेख यांनी व्यक्त केले. तसेच दर्जेदार संशोधन होणे काळाची गरज आहे असा विचार व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रा अश्विनी मुरावणे यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा. आर आर मांगले, प्रा. पी. डी. तोरसकर, प्रा ए. डी. मुडे , डॉ किरण भोसले, डाॅ बी. एम. पाटील, डॉ सचिन धुर्वे महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
13/08/2026
दैनिक तरुण भारत. दिनांक.13/08/2026
12/08/2026
वाचन संस्कृती जतन करण्यामध्ये ग्रंथालयाचे अनन्यसाधारण महत्व : प्रा. प्रकाश तोरस्कर
यशवंतराव चव्हाण (के एम सी) कॉलेज कोल्हापूर मध्ये ग्रंथालय शास्त्राचे जनक थोर विचारवंत डॉ. एस. आर.रंगनाथन यांची 134 व्या जयंती निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलत असताना प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रा. प्रकाश तोरस्कर यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन करत असताना लोक पावत चाललेली वाचन संस्कृती ही जर टिकली तरच पुढील अनेक पिढ्यामध्ये बदल घडून येतील आणि ती टिकवण्याचं कार्य महाविद्यालयातील ग्रंथालय हे समर्थपणे करत आहेत एक प्राध्यापक म्हणून एक विद्यार्थी म्हणून ग्रंथालयाशी असलेलं नातं हे दृढ केलं पाहिजे आणि त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडतं वाचन संस्कृती वरती आपल्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक विकास अवलंबून असतो असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांत नागावकर यांनी वाचनातून व्यक्तिमत्व घडते व घडलेलं व्यक्तिमत्व नेहमीच समाजाला दिशा देत असते ग्रंथालयाचे कार्य हे समाजाला दिशा देण्याचं आहे व ते सक्षमपणे पार पाडत आहे व येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करत आहे तरुण पिढीने व महाविद्यालय यातील विद्यार्थ्यांनी या ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन त्यातून विखुरलेले ज्ञान वेचावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुरुवात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आली स्वागत व प्रस्ताविकाने केली महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.आर.आर.मांगले यांनी सर्वांचे स्वागत व प्रस्तावित केले प्रास्ताविकामध्ये त्यांनी डॉ. एस.आर रंगनाथ यांनी ग्रंथालय शास्त्रामध्ये केलेले विविध प्रयोग व त्याचा परिणाम विकास यावरती प्रकाश टाकला कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. संजय कांबळे यांनी मानले व सूत्रसंचालन डॉ. समीना जमादार यांनी केले या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ. सचिन धुर्वे ,डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. जे . एम.शिवणकर प्रा. एस. एम शेख प्रा. संतोष पाटील, डॉ. रोहित बारसिंग, डॉ. नामदेव लवटे, डॉ.दिनकर कबीर, प्रा. महेश डांगे,प्रा. सुमन कांबळे डॉ .विकास नाईक डॉ. युवराज मोठे इत्यादी प्राध्यापक विद्यार्थिनी- विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Category
Telephone
Website
Address
2032 A Ward Gangavesh Dhotre Lane
Kolhapur
416012