Kutuhal Foundation

Kutuhal Foundation

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kutuhal Foundation, Non-Governmental Organization (NGO), Shop no 19, Dalal Market, behind Reliance mall, Laxmipuri, Kolhapur.

‘कुतूहल’ चे ध्येय आणि उद्देश

देशाच्या व समाजाच्या प्रगतीमध्ये तरुणांचे महत्त्व ओळखून पुढील पिढी ही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारी असावी या जाणिवेने विद्यार्थी व युवकांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार हेच उद्दिष्ट घेऊन कुतूहल फाऊंडेशनने आपले काम कोल्हापूर मधून 2017 पासून सुरू केले आहे.

बाल आणि किशोर मुलांना शाळा, घर तसेच बाहेर कोठेही नवीन शंका उपस्थित केली की, "गप्प बस, प्रश्न विचारू नको" असे सांगून त्यांना गप्प बसवले जाते. यामुळे त्यांचे कुतूहल आणि जिज्ञासू वृत्ती नष्ट होऊन जाते. याचाच विचार करून कुतूहल फाउंडेशन नवीन पिढीच्या जिज्ञासा भागावण्याचे कार्य करण्याचा उद्देश घेऊन त्या दिशेने वाटचाल करत आहे.

जिज्ञासू वृत्ती वाढीस लागण्यास अवकाश निरीक्षण हा उत्तम मार्ग आहे. आजच्या घडीला ग्रहताऱ्यांच्या बद्दल खूपच अल्प माहिती माणसाला आहे. या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन होणार आहे, याचा विचार करून शहर व परिसरातील आबालवृद्धांसाठी कुतूहल फाउंडेशन द्वारे नियमित स्टार गेझिंग अर्थात अवकाश निरीक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

भविष्यामध्ये शाळा व कॉलेज मधील विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक उपकरणे बनवण्याकरिता मार्गदर्शन करणे, फिजिक्स लॅब उभारणे या सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच कोल्हापूर शहराच्या जवळ अवकाश निरीक्षणासाठी observatory व planetarium उभे करण्याचा मानस आहे.

Telephone

Website

Address


Shop No 19, Dalal Market, Behind Reliance Mall, Laxmipuri
Kolhapur
416002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kutuhal Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Kolhapur.