Mohan Agrawal
मा.नगराध्यक्ष, परतूर
परतूर शहरात मोहनजी अग्रवाल यांच्या विशेष प्रयत्नातून परतूर वासियांना दिवाळी भेट म्हणून ठिकठिकाणी नवीन 100 स्ट्रीट लाईट पोल बसविण्यात आले आहे.
19/10/2025
परतूर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय ते गाव भागास जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोहनजी अग्रवाल यांनी तत्काळ दिवाळी पूर्वी पथदिवे बसून दिले .
परतूर शहराच्या क्षेत्रफळाचा जवळपास ४०% टक्के म्हणजे गाव भाग. ह्यामध्ये सुमारे १५ ते २० हजार लोकांना शहरात प्रवेश करण्यासाठी वापरात येणारा मुख्य रस्ता म्हणजे शासकीय ग्रामीण रुग्णालय समोरील रस्ता
या ठिकाणी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय असून, सकाळी प्रचंड वाहतूक असते परंतु रात्री शहरात येण्यासाठी प्रचंड अंधार असल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड भीतीचे वातावरण असायचे.गाव भागातील हजारो नागरिकांची रात्री दररोज होणारी गैरसोय टाळण्यासाठी माजी नगराध्यक्ष मोहनजी अग्रवाल यांनी तत्काळ दिवाळी पूर्वी रस्त्यावर पथदिवे बसवून दिले.असेच बऱ्याच ठिकाणी सुद्धा पोल बसवून झाले असून दिवाळी पूर्वी सर्व पथदिवे चालू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले
यावेळी त्यांनी सांगितले की मी कोणत्याही पदावर नसतांना सुद्धा शहरात रस्ते, नाली, सभामंडप, Highmast light , स्पीड ब्रेकर. असे कित्येक कामे पूर्ण केली आणि भरपूर कामे प्रगतीपथावर आहेत.जनतेनि जर माझी सत्ता आणून दिल्यावर परतूर शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकेन असा दृढ विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रचंड प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती दाखवून मोहनजींचे मनापासून आभार मांडले .
19/10/2025
मोहन अग्रवाल यांच्या पुढाकाराने बागल गल्ली येथील महादेव मंदिर ते स्मशानभूमी पर्यंत विद्युत पद दिव्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न नागरिकांनी केला सत्कार.
गावभागातील समशान भूमीमध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने या भागातील लोकांना रात्री अंत्यविधी करताना फार त्रास सहन करावा लागत होता या सर्व गोष्टीचा विचार करता परिसरातील नागरिकांनी याबाबत वेळोवेळी मोहन अग्रवाल यांच्याकडे पतदिव्यांची मागणी केली होती ती मागणी आज दिवाळी भेट म्हणून पूर्ण झाली त्याबद्दल नागरिकांनी मोहन अग्रवाल यांचे आभार मानले.
याप्रसंगी यांच्यासोबत माजी नगरसेवक वैजनाथ दादा बागल माजी नगरसेवक गणेश सिंग ठाकूर ,प्रभाकर नाना बागल, शहर प्रमुख, दीपक हिवाळे, बालाजी ढोबळे सर, शेख अक्रम अल्पसंख्यांक शहर प्रमुख, तेजस भाई अग्रवाल, कृष्णा अग्रवाल, परवेज देशमुख, नारायणराव उबाळे, एकनाथराव उबाळे, शिवाजीराव उबाळे, शिवाजीराव मुजमुले, अनिल ठोंबरे, संदीप चुंगडे, संतोष चुंगडे, प्रभाकर बागल, बाबा महाराज बागल यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
13/10/2025
परतूर येथील बालाजी नगर चा रस्त्याचा प्रश्न मोहन अग्रवाल यांनी तत्काळ सोडवला .
मागील काही दिवसापासून तेथील माता भगिनींनि आम्हाला हा मुख्य DP रस्ता (कृष्णमोती हॉटेल ते रो:हाऊस पर्यंत) करून द्या असा आग्रह मोहनजी अग्रवाल यांच्या कडे केला होता . या विनंतीला मान देऊन लगेचच 50 लक्ष रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून काही महिन्यातच त्यांना त्यांचा रोड पूर्ण करून दिल्या बद्दल तेथील नागरिकांनी मोहनजींचा मोठा सत्कार केला आणि या वेळी त्याचे मनापासून आभार मानले आणि बालाजी नगर ही शहरातील जुनी उच्चभ्रू वस्ती आहे.तेथील जवळपास सर्व रस्ते, नाल्या, लाईट मोहनजींनी पूर्ण करून दिल्या आहेत.
08/10/2025
काल उशिरा रात्री मोहनजी अग्रवाल यांनी परतूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेतली.
#माजी_नगराध्यक्ष_मोहन_अग्रवाल
08/10/2025
आगामी नगर परिषद परतूर निवडणूक लढवणार, लवकर नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी परिपूर्ण आणि योग्य उमेदवार घोषित करणार.
शहरात कोणतेही सत्ता नसतांना सुद्धा माझ्यामार्फत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचे रस्ते,नाली, लाईट पोल (हायमास्ट) असे कामे झालेली असून बरेच कामे प्रगतीपथावर चालू आहेत. त्यामुळे जनता आमच्या सोबत नक्कीच असेल
#माजी_नगराध्यक्ष #मोहन_अग्रवाल यांचे प्रतिपादन
मोहन अग्रवाल ने चूनाव को लेकर लोगों से की अपील अपने उम्मीदवार को लेकर होगा ऐलान मोहन अग्रवाल ने चूनाव को लेकर लोगों से की अपील अपने उम्मीदवार को लेकर होगा ऐलान
18/11/2024
काल रात्री प्रचार दौरा करतांना बाबई गावामध्ये हनुमान मंदिर येथे लोकांना लाईट गेल्यावर गैरसोय होत आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.
त्यांना आज लगेच सकाळी inverter बसवून दिले
यावेळी "अस काम आज पर्यंत कोणत्याच बोलबच्चन नेत्यांनी करून नाही दिले फक्त भावी आमदार मोहन अग्रवाल यांनी केले असे उद्गार ग्रामस्थांनी काढले"🙏
#लाडक्या_बहिणीचा_लाडका_भाऊ #मोहन_अग्रवाल_यांचे_विकास_कार्य #आपल्या_हक्काचा_माणूस_मोहन_अग्रवाल
Category
Website
Address
Laddha Colony Mondha
Partur
431501
Alerts
Be the first to know and let us send you an email when Mohan Agrawal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.