Pustak Shop

Pustak Shop

Share

साहित्यातील ज्ञात-अज्ञात, नवोदित लेख?

10/09/2026

आपली प्रत सवलत दरात आजच बुक करा....

10/09/2026

छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ लढाया, शाहिस्तेखान आणि अफझलखान यांच्या पुरता मर्यादित नाही...

तो आहे मलिक अंबर, मालोजीराजे, शहाजीराजे, जिजाऊ यांच्यापासून आलेल्या कृतिशील जाणिवेचा प्रवास...
जिला जिजाऊ आणि शहाजीराजेंनी रयतेच्या मनात मशाल म्हणून पेटवलं...
पुढे याच मशालीला छत्रपती शिवाजीरायांनी रयतेच्या स्वराज्यात साकार केलं...

येत आहे लवकरच...

‘शिवबाच्या स्वराज्याची गोष्ट’

जी आवर्जून वाचली पाहिजे.

लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या वाचनात असावे असे पुस्तक.

‘ #शिवबाच्या स्वराज्याची गोष्ट'- (भाग १)

लेखक : राहुल ओझरकर

प्रकाशक : हरिती पब्लिकेशन
इतिहास वाचायचा नसतो फक्त…
तो अनुभवायचा असतो, समजून घ्यायचा असतो आणि पुढे सांगायचा असतो.
🚩 आजच तुमची प्रत प्री-बुक करा!
📞 7385521336
शिवबाची गोष्ट… स्वराज्याची प्रेरणा… प्रत्येक मनासाठी! 🚩
#शिवबाच्या_स्वराज्याची_गोष्ट
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#स्वराज्य
#मराठीपुस्तक
#इतिहास

14/08/2026
14/08/2026

#खासबालवाचकांसाठी

📌 मुलांना इंग्रजी मधील गोष्टीचे पुस्तक वाचायचे असतात. इंग्रजी पुस्तकातल्या गोष्टी ची पुस्तकं आता आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत.चित्रांमधून गोष्टी तयार करून तुम्ही तुमच्या मुलांना गोष्ट सांगू शकता. या पुस्तकांमध्ये ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून तुम्ही मुलांना गोष्ट सांगू शकता. या पुस्तकांना स्पर्श करून तुम्ही मुलांना गोष्टी सांगू शकता. आणि अशीच विविध रंगाची ढंगाची गोष्टीची पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध झालेली आहेत.

☎️ 7385521336

#पुस्तक #हरिती_वाचन_चळवळ #गोष्ट पुस्तक आणि बरच काही हरिती बुक गॅलरी

05/08/2026

Celebrating my 6th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

05/08/2026

✍️नव पुस्तक
✍️नवा विचार

Hariti Prakashan चे नवीन पुस्तक प्रकाशित झालेले आहे प्रकाशन पूर्व सवलत दरामध्ये बुकिंग केलेल्या वाचकांना पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये हे पुस्तक मिळेल.
तुम्ही अजूनही पुस्तक घेतला नसाल तर आजच हरिती बुक गॅलरी कडे संपर्क करा.

☎️ 7385521336
Hariti_book_gallery

#पुस्तक #हरिती_वाचन_चळवळ #लैगिक_छळ

23/07/2026

ुस्तक

📌प्रकाशन पूर्व बुकिंग सुरू....

✒️प्रा. डॉ. हणमंत पवार यांच्या 'गावभुईतली माणसं' या पुस्तकाच्या कथनअवकाशाचा पैस मोठा आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम, किल्लारीचा भूकंप ते कोरोना भयलाटेची संदर्भ बहुलता त्यात आढळते.अशा विविध विस्थापनांच्या अनेकमीतीय अवकाशात माणसांच्या आयुष्यात झालेल्या स्थित्यंतराचा,बदललेल्या जीवनप्रवाहांचा आणि तरीही चिवटपणे जगण्याची उमेद शाबूत ठेवून जगणाऱ्यांच्या या कहाण्या आहेत.

आपल्या नितळ निर्मळ आणि निर्भिड जगण्यावर अनिवार निष्ठा असलेली माणसं हीच या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. लौकिक अर्थाने ही माणसं सर्वसामान्य आयुष्य जगणारी आहेत ती चेहराविहीन,परिस्थिती शरण,व्यवस्थाशरण आणि हतबल आहेत.तशी त्यांना कुठलीही स्वतंत्र म्हणावी अशी ओळख नाही. मात्र त्यांच्या जगण्यातील असामान्य पण हणमंत पवार यांनी उमगले आहे. लौकिक विस्थापनांपेक्षाही भावनिक आणि मानसिक विस्थापनाची गडद गहिरी शोकात्व परिणामकारकता हे लेखन दग्गोचर करते.

प्रा हणमंत पवार यांची कथन शैली ही अत्यंत रसाळ आहे. चित्रदर्शी आणि प्रासादिक भाषेचे वरदान त्यांना लाभले आहे.त्यामुळे गावभुईतली माणसं काळजाचा ठाव घेत एका गावाची बहुअंगी गोष्ट सांगतात. ही माणसं अस्वस्थ करीत काळजात नांदत राहतात .मुख्य पात्रांच्या सोबतच उपपात्रांच्या कथा- कहाण्या नकळतपणे उलगडत जातात. हे हणमंत पवार यांच्या लेखनाचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

- ऋषीकेश गंगाधराव देशमुख

पुस्तकाचे नाव : गावभुईतली माणसं
लेखक : प्रा. डॉ. हणमंत पवार
मूळ किंमत: 230/ रु.

प्रकाशन पूर्व सवलत किंमत : 150/ रु.
संपर्क: 7385521336.

Hariti Publications Hariti Prakashan

23/07/2026

▪️सांस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तनवादी शस्त्र म्हणजे त्रेमासिक विचारशलाका :- आ. ह. साळुंखे

▪️संपादक प्राचार्य नागोराव कुंभार संपादित #विचारशलाका हे त्रैमासिक मागील 41 वर्ष झालं सुरू आहे. विचारशलाकाने आज पर्यंत विविध महत्त्वाच्या विषयांवरचे वैचारिक अंक प्रकाशित केलेले आहेत . महाराष्ट्राची वैचारिक भूक भागवण्याचे काम केलेलं आहे.यापूर्वी कुंभार सरांनी #बौद्ध_तत्त्वज्ञान_विशेषांक , #बसवण्णा_तत्त्वज्ञान विशेषांक ,आणि #जैन_तत्वज्ञान #चार्वाक विशेषांक आणि #महानुभाव_तत्त्वज्ञान विशेषांक विचार शलाकाच्या माध्यमातून वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहेच. याच मालिकेतील सहावा अंक म्हणजे #संत_तुकाराम व संत कबीर विचारविश्व विशेषांक वाचकांसाठी उपलब्ध आहे. या विशेष अंकामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या अभ्यासकांचे वैचारिक मांडणी करणारे महत्वपूर्ण असे 50 च्या वर लेख आहेत.

अंकाची मूळ किंमत :- 600/रू.
सवलत दरात उपलब्ध

☎️ :- 073855 21336

#हरिती_वाचन_चळवळ #विचारशलाका

(अंकाची अनुक्रमानिका हवी असेल तर वॉट्सअप संपर्क करा. पाठवतो.)

21/07/2026

पुस्तकाचे नाव : उपवर्गीकरण की 125 पिढ्यांचा हिशोब
लेखक: मिलिंद कीर्ती

#उपवर्गीकरण #वाचनचळवळ

16/05/2026

प्राच्यविद्यापंडीत काॅ. शरद पाटील यांची ग्रथसंपदा सवलतीच्या दरात,

या देशाचे मुख्य सांस्कृतिक विभाजन हे ब्राह्मणी विरुद्ध अब्राह्मणी हेच आहे.
असे निक्षून बजावणारा व त्यासाठी आयुष्यभर प्रबोधनाच्या रणमैदानात एकाकीपणे झुंज देणारा योद्धा कॉग्रेड !
ब्राह्मणी व अब्राह्मणी म्हणजे अनुक्रमे विषमतावादी व समतावादी यांच्यातील संघर्ष असल्याने, केवळ जन्माने ब्राह्मण असणारांनी व ब्राह्मणांपेक्षा ब्राह्मणनिष्ठ बनू पाहणाऱ्यांनी अस्वस्थ होऊ नये...
- किशोर मांदळे

एकुण पुस्तके = १८
एकुण किंमत = ४२५५₹

१) रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष = २५०₹
२) "शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण-महंमदी की ब्राह्मणी" = ३००₹
३) दास शुद्रांची गुलामगिरी भाग २ = ७००₹
४) दासशुद्रांची गुलामगिरी = ६००₹
५) जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व = ३००₹
६) प्रिमिटिह्व कम्युनिझम व मातृसत्ता = ३००₹
७) मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद = ५००₹
८) अब्राह्मणी साहित्य आणि कलांचे सौंदर्यशास्ञ = ३००₹
९) शोध = २५₹
१०) बुद्ध भिक्कु आनंद विशाखा = १००₹
११) जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती = ४००₹
१२) नामांतर औरंगाबाद आणि पुण्याचे = ५०₹
१३) आर्य आणि अनार्य = ८०₹
१४) बुद्ध: भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत = ५०₹
१५) वर्णजाती व वर्गसंघर्ष = ५०₹
१६) भारतीय सौंदर्यशास्त्र = ५०₹
१७) रामराज्य ते गोकुळ आणि कृष्ण ते बुद्ध = १००₹
१८) पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका = १००₹

टीप :- सर्व पुस्तके हवी असतील तर सवलतीत मिळतील.

पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क:- 073855 073855 21336

Category

Telephone

Address


Pune