Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Share

Official Page of Navayan Mahajalsa
Contact : 8802194194, 8803194194

Sheetal Sathe
Sachin Mali
#Folk Arts
#Folk Music
Jalsa Studio

08/08/2026

Jalsa Podcast Station Presents… #001

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक संयुक्त जयंती निमित्ताने…
💙💛🩵💚🧡🩷💜💗 💙💛🩵

स्पेशल…पॉडकास्ट
JALSA WITH SHEETAL SACHIN ☕️

https://youtu.be/XCCtToz04AE?si=3U8Jx3q2aVVMCe79

हा आमचा पहिला पॉडकास्ट आहे… तुमच्या अभिप्रायामुळे पुढील पॉडकास्ट आणखी सुंदर होतील. नक्की लिहा 🙏🏼

आपले
शितल-सचिन🫰🏼

02/08/2026

माझी मैना गावावर राहिली…ही छक्कड प्रथमच शाहीर शितल साठे यांच्या आवाजात 💗💗💗
लिंक कमेंटमध्ये आहे 👉🏼

30/07/2026

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव ते मुंबई या पायी प्रवासाची विदारक कहाणी न रडता गाण्यातून ऐका…😭
लिंक कमेंटमध्ये आहे

30/07/2026

नवी कलाकृती 💫

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वाटेगाव ते मुंबई प्रवासाची संघर्षमय कथा…गाण्यातून ऐका…🆗

वाट मुंबईची चाललो मी…🤲🏼

https://youtu.be/nX3gPY_ftPo?si=aBQWMXvbKv-KDiuG

डोळ्याला पाणी आल्याशिवाय राहणार नाही🥲

आणि तुमचा अभिप्राय लिहा! शेअर करायला विसरू नका!!✅

शाहीर शितल साठे यांच्या लेखणीतून आलेले अजरामर गीत त्यांच्याच आवाजात 🎙️
💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙💛💙

18/07/2026

काव्याची सुमने वाहू..
स्वर विद्रोहाचा गाऊ..
की प्राणज्योत लाऊ..
वंदितो लोकशाहीरा अण्णाभाऊ...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त यांना विनम्र अभिवादन.........
💜💜💜💜💜💜💜
*TAL

16/07/2026

जाती जातीत लावलाय दंगा रं
कसा आंब्यानं पाडलाय आंबा रं… धृ

झेंड्या झेंड्याला भिडल्यात झेंड
जो तो हाणायला लागलाय शेंड
जाती जातीत माजल्यात गेंड
अक्कल खायला लागली पेंड
जाती भवतीच घालत्यात पिंगा रं
कसा आंब्यानं पाडलाय आंबा रं… १

कोण आगीत वततंय तेल
बांग देऊन कोंबड मेलं
कसा अवचित गेलाय तोल
अहंकाराची भांग लई पिलं
सोशल मिडियात झालाय नंगा रं
कसा आंब्यानं पाडलाय आंबा रं… २

रोज शिव्याची लाखोली व्हात
आईमाईच्या अब्रुला हात
दिली पेटवून जातीची वात
दिसू लागले दडलेले दात
माणुसकीशीच घेऊन पंगा रं
कसा आंब्यानं पाडलाय आंबा रं… ३

जातीपातीनं सडवलं डोक
कुठं घावतील भारताची लोकं
भेदाभेदाची उपटूनी मेख
बंधुतेचा आज विनावा गोफ
शाहीर सचिन च्या हाती तिरंगा रं
हृदयी व्हावू दे समतेची गंगा… ४

गीतकार : शाहीर सचिन माळी
गायिका : शाहीर शितल साठे 🎙️
🎶
हे बंधुता गीत Youtube वर पूर्ण ऐकता येईल. खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/h8-FJ54KEak?si=nUSKbWf9ick3Of43

आजच्या काळाला नेमकेपणाने भिडणारे हे गीत नक्की ऐका आणि Like, Share, Comment करा!
✅💙💛🧡🩵💚🩷💜✅ 💙💛🧡🩵💚🩷💜✅

15/07/2026

महाराष्ट्राला भुरळ घालणारा एक बुलंद आवाज...
भिमाईच्या लेकराचा
रामजीच्या वासराचा
पायगुण असा भारी
जागा केला... जगजेठी गा ..
या अजरामर गाण्याचे आर्त स्वर आजही भारावून सोडतात.
भीमगीते.. त्याचप्रमाणे कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची श्रमगीते, महाराष्ट्राची लोकसंस्कृती,लोकगीते लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आयुष्यभर गायिली..
आयुष्यभर लोककलेची सेवा केली.
शेवटी हेच खरे आहे की लोककलावंत आयुष्यभर कला जगतात.
त्यांच्यानंतरही त्यांची कलाच जिवंत राहते आणि समाजालाही जिवंत ठेवते अशा या महान लोककलाकाराला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*TAL

14/07/2026

बंधुता गीत 💙💛✅

जाती जातीत लावलाय दंगा रं
कसा आंब्यानं पाडलाय आंबा रं…🎙️

https://youtu.be/h8-FJ54KEak?si=nUSKbWf9ick3Of43

गीतकार : शाहीर सचिन माळी
गायिका : शाहीर शितल साठे
🎶
आजच्या काळाला नेमकेपणाने भिडणारे हे गीत नक्की ऐका आणि Like, Share, Comment करा!

💙💛💙💛💙💛💙💛💙👍🏼💙💛💙💛💙💛💙
#शाहिरीजलसा Folkmarathisong shahirsh*talsathe shahirsachinmali

13/07/2026

नवीन मानवतावादी गीत 🎙️

जाती जातीत लावलाय दंगा रं
कसा आंब्यानं पाडलाय आंबा रं…

https://youtu.be/h8-FJ54KEak?si=nUSKbWf9ick3Of43

गीतकार : शाहीर सचिन माळी
गायिका : शाहीर शितल साठे
🎶
आजच्या काळाला नेमकेपणाने भिडणारे हे गीत नक्की ऐका आणि Like, Share, Comment करा!

🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲🎲
#शाहिरीजलसा *talsathe

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Bhavani Peth
Pune
411042