The Farm

The Farm

Share

Strategic Solutions for Agri-Business and Farming Prosperity

https://academy.the-farm.in/s/store

25/07/2026

राम कृष्ण हरी 🙏🚩

24/07/2026

We're Hiring! 🚀

Passionate about agriculture and content creation? 🌱✍️
The Farm is looking for Content Leads to join our growing team.

If you have a B.Sc. (Agri.) or an agriculture-related background and experience in content writing & research, we'd love to hear from you.

📍 Apply now by scanning the QR code

20/07/2026

'द फार्म'मध्ये रिसर्च विंगचे नेतृत्व करणारे आमचे सहकारी आणि अर्थतज्ज्ञ कु. अजित लाड यांची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेकडून (ECOSOC) विशेष सल्लागार दर्जा प्राप्त असलेल्या देशातील अग्रगण्य शिक्षण व संशोधन संस्थांपैकी एक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या 'वसंतराव पटवर्धन नेतृत्व व क्षमता विकास फेलोशिप'साठी निवड झाली आहे.

या फेलोशिपअंतर्गत ते पुढील सहा महिन्यांमध्ये 'प्राथमिक कृषी पतसंस्था' (PACS) यांचे बहुउद्देशीय सहकारी संस्थांमध्ये रूपांतर या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल संशोधन करणार आहेत.

'द फार्म' आणि संपूर्ण टीमसाठी हा अत्यंत अभिमानाचा, आनंदाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे.

03/07/2026

चीनची प्रगती का झाली? कारण…

"वर्षभराचा विचार असेल तर पीक लावा. दशकाचा विचार असेल तर झाडे लावा. पण आयुष्यभराचा विचार असेल तर माणसं घडवा."

ही चिनी म्हण केवळ प्रेरणादायी नाही, तर चीनच्या विकासाचा मूलमंत्र आहे. शेती, उद्योग किंवा समाज कोणत्याही क्षेत्रात शाश्वत बदल घडवायचा असेल तर ज्ञानाची आणि कौशल्याची गुंतवणूक सर्वात महत्त्वाची असते. पिके एका हंगामापुरती, झाडे अनेक वर्षांसाठी; पण योग्य प्रशिक्षण आणि शिक्षण घेतलेली माणसं अनेक पिढ्यांचे भविष्य घडवतात.

म्हणूनच प्रत्येकाने स्वतः शिकत राहावे आणि इतरांनाही शिकण्याच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. खऱ्या अर्थाने विकास हा इमारतींमध्ये नाही, तर सक्षम, विचारशील आणि प्रशिक्षित माणसं घडवण्यात असतो.

29/06/2026

विहीर पाडून बघावी म्हणतात, ते उगाच नाही!

शेतीत काही निर्णय असे असतात की ते घेताना सोपे वाटतात, पण ते पूर्ण करताना तुमचा खरा कस लागतो. माझ्यासाठी २०२५ मधला विहीर खोदण्याचा निर्णय काहीसा तसाच होता.

माझ्या शेतात पाण्याची थोडी टंचाई जाणवत होती. म्हणून ठरवलं की यावर्षी विहीर आणखी खोल करायची. मला वाटलं काम अगदी सोपं असेल. कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचं आणि काही दिवसांत विहीर तय्यार. त्याप्रमाणं डिसेंबरमध्ये काम सुरू झालं. आधीच ४० फूट खोल असलेल्या विहिरीला आणखी २० फूट खाली न्यायचं ठरलं. सगळं प्लॅनिंग झालं, खर्च ठरला आणि कामाला सुरुवात झाली.

पण पहिल्याच टप्प्यात अडचणी सुरू झाल्या.

विहिरीत खूप पाणी होतं. ते काढण्यातच बरेच दिवस गेले. पाणी कमी झालं की पुन्हा जमिनीतून झरे सुरू व्हायचे. मग ब्लास्टिंग सुरू झालं. काही फूट काम पुढे गेलं आणि अचानक कॅनॉलला पाणी आलं. विहिरीत पुन्हा एकदा पाणी भरलं आणि जोमानं सुरू झालेलं काम पुन्हा बंद झालं.

परत ये रे माझ्या मागल्या सारखं झालं. मग पुन्हा पाणी काढा, पुन्हा काम सुरू करा, पुन्हा कॅनॉलला पाणी आणि पुन्हा एकदा काम बंद. असं करता करता डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च गेले. शेतात दगडांचे ढीग, पाईपलाईन, मोटारी आणि सतत चालणारी धावपळ हे नॉर्मलच झालं. मग कधी पाणी दुसऱ्या विहिरीत टाकायचं, कधी ओढ्यात सोडायचं असं करत होतो. पण त्यामुळे खर्च वाढत होता आणि वेळही जात होता.

यामध्ये जितकी धावपळ माझी झाली नाही तितकी धावपळ माझ्या वडिलांची झाली. कारण, ब्लास्टिंगच्या वेळी मोटारी काढणं, पाणी उपसणं, कामगारांशी बोलणं हे सगळं त्यांनी मी गावाकडं नसताना हाताळलं.
शेवटी लगेच पावसाळा जवळ आला आणि सगळच काम थांबवावं लागलं. मग बरेच दिवस गेले. आणि मग सहा महिन्यांच्या प्रयत्नांनंतर आम्ही ठरवलं २० फूट नाही, तर फक्त १३ फूट विहीर खोल करूयात. आणि मग २० नाही पण निदान १३ फूट खोल विहीर आम्ही करू शकलो.

या संपूर्ण अनुभवातून एक गोष्ट मला शिकायला मिळाली शेतीमध्ये कोणतंही काम बाहेरून दिसतं तितकं सोपं नसतं. अनेकदा आपण खर्चाचा अंदाज लावतो, पण वेळ, मॅनेजमेंट, अनपेक्षित अडचणी यांची गणितं विसरतो. कधी कधी तर ती गणितं सोडवणं मुश्किल होतं, पण म्हणून त्यांना इग्नोर करून चालत नाही. कारण शेतीत यश फक्त पैशांवर अवलंबून नसतं; ते प्लॅनिंग, संयम आणि परिस्थितीनुसार डिसिजन घेण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतं.

आज कोणी मला विचारलं की ‘विहीर पाडून बघावी’ या म्हणीचा अर्थ काय, तर मी फक्त हसेन आणि सांगेन, “काही गोष्टींची खरी किंमत पैसे नाही, तर अनुभवच सांगतात.”

-संतोष जाधव (इंडियन फार्मर)

Photos from The Farm's post 15/05/2026

शेतकऱ्यांना 'कर्ता' करणारा #दीपस्तंभ हरपला..

भावपूर्ण श्रद्धांजली आनंद नाडकर्णी सर

आमच्या संपूर्ण 'द फार्म' टीमने #कर्ता_शेतकरी या कार्यक्रमाचे सर्व एपिसोड मागील महिन्यात बघितले त्यावर सखोल चर्चा केली. आम्ही सोमवारपासून होणाऱ्या आमच्या डेमो बॅचमध्ये त्यातील काही सेशन घेणार होतो. त्याची येणारी प्रतिक्रिया सरांना कळविण्याची इच्छा होती पण काळाचा महिमा कुणाच्या हातात नाही.

'कर्ता शेतकरी' हा सरांनी विकसित केलेला उपक्रम सगळ्या शेतकरी वर्गापार्यात पोहचविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल..

Photos from The Farm's post 13/05/2026

📍आमच्या यशाच्या प्रवासातील #शिलेदार…

कोणत्याही प्रयत्नशील आणि नवी वाट निर्माण करणाऱ्या आंत्रप्रेन्युअरच्या यशामागे एक प्रभावी टीम असते. त्या टीमच्या बळावरच अशक्यप्राय गोष्टी शक्य होत असतात.

आज अशाच एका खास, खंबीर आणि समर्पित टीम मेंबरचा वाढदिवस आहे - वैष्णवी राऊत.

माझ्या टीममध्ये आजपर्यंत ज्या सगळ्या लोकांनी काम केले, त्यांनी पुढील टीमसाठी प्रचंड मेहनतीचा आणि समर्पणाचा वारसा निर्माण केला; हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल. त्या मौल्यवान व्यक्तींमधील एक माणिक म्हणजे आमच्या टीमच्या वैष्णवी मॅडम.

पुण्यात असताना सकाळ-संध्याकाळ शाळेतील मुलांचे क्लासेस घेणे, दिवसभर ऑफिसचे काम करणे आणि घरी वेळ उरला तरी ऑफिसची जबाबदारी सांभाळणे इतके व्यस्त असूनही त्यांनी प्रत्येक कामाला १००% न्याय दिला. अगदी रविवार असला तरी त्यांचा मला फोन यायचा, “सर, आज मी निवांत आहे; काही काम असेल तर सांगा.”

आजच्या काळात घड्याळाकडे पाहून ऑफिसची वेळ ठरवणारे, कामाच्या दिवशी मुद्दाम दांडी मारणारे आणि जबाबदाऱ्या टाळणारे अनेक लोक आपण पाहतो. पण द फार्मकडे स्वतःची कंपनी म्हणून पाहणारी वैष्णवी म्हणजे या मानसिकतेला दिलेली एक चपराकच आहे.

मागील सहा महिन्यांत आम्ही नाशिकला आल्यापासून तिने दिवसाचे १२–१५ तास काम करून आमच्या प्रोजेक्टला एक वेगळी उंची देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. वैष्णवी कोणतेही काम करत आहे म्हटले की आम्ही निर्धास्त असायचो, कारण तिची परफेक्शनची पातळी खरोखरच अप्रतिम आहे.

कदाचित तिच्या कष्टांएवढा मोबदला आम्ही तिला देऊ शकलो नाही, याची खंत मला कायम राहील.

पुढील काही महिन्यांत ती नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. मोठा भाऊ म्हणून माझे आणि माझ्या कुटुंबाचे आशीर्वाद व प्रेम तिच्यासोबत कायम राहील.

आमच्याकडे शिकलेल्या अनेक नाविन्यपूर्ण गोष्टींच्या बळावर भविष्यात ती एक यशस्वी आणि प्रतिथयश #उद्योजिका बनेल, याची आम्हाला खात्री आहे.

आज वैष्णवीचा वाढदिवस आहे. तिचे हे सातत्य, प्रेरणा आणि कष्टाळूपणाचे गुण आयुष्यभर असेच तेजाने झळकत राहोत, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.

-रितेश पोपळघट, द फार्म

01/05/2026

महाराष्ट्र दिन & कामगार दिन 🚩

Photos from The Farm's post 22/04/2026

🚀 Join the Mission to Transform Agriculture through !

📍The Farm is looking for:
✔️ Content & Communication Executives (02)
✔️ Training Co-Ordinator (02)

If you believe in empowering farmers through knowledge, innovation, and impactful communication - we want you on our team.

📍 Nashik | 📅 Deadline: 26 April 2026

📲 Apply now via QR code

19/04/2026

Wishing you a lifetime of happiness, love, and prosperity on the auspicious occasion of .

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


The Farm, Syndicate Hall, Vaikunth Mehta National Institute Of Cooperative Management, Near Chatursingi Temple, Ganeshkhind
Pune
411007