BPS Entertainment

BPS Entertainment

Share

'व्हॉट्सऍप'मुळे सध्याच्या तरुण पिढीच?

साधारण तीन वर्षांपूर्वी भावे प्राथमिक शाळा, १९९६ चौथी पास आऊट बॅच मधील आम्ही काही मित्रमैत्रिणींनी एकत्र येऊन एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला आणि "BPS"चा जन्म झाला. (BPS म्हणजे आमची Bhave Prathamik Shala)

अनेक जुने मित्र मैत्रिणी, काही एकमेकांना ओळखणारे तर काही अजिबात नाव न ऐकलेले..यथावकाश एकमेकांना जाणून घेऊन, अनेक गोष्टी शेअर करुन, प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहून आणि त्याचबरोबर अनेकविध आनंदी प्रसंग, कार्यक्रम, गेटटुगेदर ह्यातून एकमेकांबरोबरचं बॉन्डिंग घट्ट होत गेलं.

याच ग्रुपमध्ये विविध क्षेत्रात अनुभवी, पारंगत आणि कलाकौशल्य असलेल्या हौशी लोकांमुळे आणि त्यांच्या कलागुणांना वाव आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावं या इच्छेपोटी गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या सर्वांच्या डोक्यात एक किडा वळवळत होता की आता नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करावं. आपल्या लोकांसाठी, शाळेतल्या मित्रमैत्रिणींसाठी, त्यांच्या घरच्यांसाठी आणि त्याचबरोबर पुण्यातल्या आणि पुण्याबाहेरच्या रसिक लोकांसाठी मोठ्या व्यासपीठावर प्रसिद्ध कार्यक्रमांचे, नाटकांचे आयोजन करण्याची कल्पना डोक्यात आली. सर्वांचे विचारविनिमय झाले आणि 'BPS Entertainment' नावाने एक छोटसं प्रॉडक्शन हाऊस चालू करायचं पक्कं झालं.

नक्की काय करणार हे BPS Entertainment??
तर तुम्हा आम्हाला भावलेले कार्यक्रम, गाण्याच्या मैफिली, इव्हेंट्स, शॉर्टफिल्म्स, एकपात्री प्रयोग, नाटकं ह्यांचं आयोजन आम्ही करणार आणि मराठी रसिकांसाठी स्वतःचं आपलं वाटणारं आणि निखळ आनंद देणारं एक प्रॉडक्शन हाऊस घडवणार.
हे करता करता पुढे जाऊन वरील गोष्टींची निर्मिती करण्याचा देखील आमचा मानस आहे.

अर्थातच ह्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हा सर्वांचं पाठबळ, सहभाग आणि आशीर्वाद ह्या सगळ्यांची आम्हाला गरज आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही मायबाप रसिक हे सगळं भरभरुन द्याल आणि आम्ही देखील तुमच्या विश्वासास पात्र होऊन तुमच्या अपेक्षा नक्की पूर्ण करु.

मग देताय ना आम्हाला संधी?


आपलेच,
BPS Entertainment

Category

Website

Address


Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when BPS Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.