Rohit Rajendra Pawar
MLA from Karjat-Jamkhed
13/08/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटीशर्ती रद्द करुन संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कर्जातून मुक्त करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांसोबत संघर्ष केला आणि सरकारला झुकवलं त्याच शेतकऱ्यांनी जामखेडप्रमाणेच कर्जतमध्येही नागरी सत्कार करुन संघर्षाला एकप्रकारे बळ देण्याचंच काम केलं. हे शेतकरी बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. २०१९ मध्येही यांनीच संघर्ष करायला शिकवला होता. आज त्यांनी केलेल्या नागरी सत्काराचा नम्र स्वीकार करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष (दक्षिण) प्रा. सीताराम काकडे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) किरण पाटील, बळीराम यादव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि नागरीक यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी कर्जतचं ग्रामदैवत सद्गुरु संत श्री गोदड महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन नतमस्तक झालो.
13/08/2026
बोलीभाषेत शेतकऱ्याला ‘राजा’ संबोधलं जात असलं तरी राज्यातील शेतकऱ्याला मात्र कायम संघर्ष करावा लागतो. नुकत्याच झालेल्या कर्जमाफी योजनेतही या सरकारने जाचक अटीशर्तीचा अडथळा टाकला होता आणि तो काढण्यासाठी याच बळीराजाच्या साथीने आधी पंढरपूर आणि नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्हाला संघर्ष करावा लागला.. त्यानंतर सरकारने या जाचक अटीशर्ती हटवल्या. त्यामुळं कर्जमाफी योजनेतून वंचित राहणाऱ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील सुमारे ६० हजार शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
याबाबत जामखेड येथील पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी बैलगाडीतून मिरवणूक काढून नागरी सत्काराचं आयोजन केलं होतं. वास्तविक हा घरचा सत्कार माझ्यासाठी खूप मोलाचा असून प्रत्येक संघर्षात संपूर्ण मतदारसंघ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यानेच मला यशस्वी संघर्ष करता आला, हे मान्य करावं लागेल. पदाधिकारी व शेतकऱ्यांनी प्रेमाने केलेल्या या नागरी सत्काराचा नम्र स्वीकार करुन त्यांचे आभार मानले आणि यापुढंही जनहिताच्या प्रत्येक संघर्षात असंच पाठीशी रहाल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
#कर्जमाफी #शेतकरी #बळीराजा #शेतकरीसंघर्ष #कर्जत_जामखेड # #जनहिताचा_संघर्ष #बळीराजासाठी_संघर्ष #शेतकरी_सन्मान #जनतेचा_आशीर्वाद #जामखेड
13/08/2026
‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मूलमंत्र आदिवासी विकास विभागाने ‘मर्यादितच शिका, संघटीत होऊ नका आणि संघर्ष तर बिलकूल करू नका’ अशा पद्धतीने बदलला की काय अशी शंका यावी असा उरफटा GR या विभागाने काढलाय. वसतीगृहात प्रवेशासाठी वयाची मर्यादा २६ वर्षे घातली असून स्थानिक विद्यार्थ्यांना ७० टक्के आरक्षण दिल्याने उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्याचा विद्यार्थ्यांचा मार्ग खडतर होणार आहे. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना कोणत्याही संघटनेत आणि आंदोलनात भाग घेता येणार नाही आणि समान स्तरावरील दुसरी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखील बंधन टाकण्यात आलं. हा तर थेट संविधानाने दिलेलं स्वतंत्र काढून घेण्याचाच प्रकार आहे. आदिवासी विभागाने हा तुघलकी GR तत्काळ मागे घ्यावा अन्यथा आम्हाला संघटीतपणे संघर्ष केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
Devendra Fadnavis
अकाली दलाचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर नांदेड येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! बादल यांची प्रकृतीला लवकर आराम पडावा, ही प्रार्थना! बादल यांच्यासारख्या नेत्यावर नांदेडमध्ये झालेला हल्ला हा महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालायला लावणारा आणि सरकारची इज्जत वेशीवर टांगणारा आहे. यातील हल्लेखोर आणि त्यामागील सूत्रधार यांचे खरे चेहरे समोर आले पाहिजेत आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
Devendra Fadnavis
मोशी कचरा दुर्घटनेत मृत्यू झालेले कामगार नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याचं वृत्त मन सुन्न करणारं आहे. कचऱ्याचा डोंगर कोसळल्यामुळं गायकवाड कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि आता तर याच कुटुंबातील दुसरा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी आहे. या अपघातग्रस्त सर्व पिडीत कुटुंबांना १ कोटी रुपये भरपाई देण्याची आमची मागणी होती, परंतु कंपनीने केवळ ४० लाख रुपयांमध्ये तडजोड करुन एकप्रकारे कामगारांच्या मृत्यूचा सौदा केला. तेही आधी २५ लाख देण्याचीच तयारी दर्शवली पण दबाव टाकल्यानंतर ४० लाखात तडजोड केली. आमची मागणी आहे की सर्व कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा गायकवाड कुटुंबाप्रमाणे इतर कुटुंबातही असे बळी जाण्याची भीती आहे. त्यासाठीच मी उद्या महापालिकेत जात आहे.
सोनाली गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
चाकण MIDC मधील व्यावसायिकांना अनेक अडचणी येत असल्याने ते येथून स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं चाकण सोडून न जाता सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी उद्या (शुक्रवार, दि. १४) सकाळी १० वाजता साईसागर हॉटेल, कुरुळी, चाकण एमआयडीसी इथे या उद्योजकांची भेट घेणार आहे. तर मोशी दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे केलेल्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्यासाठी दुपारी १ वाजता महापालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
संपर्क व समन्वयासाठी संपर्क क्र. - उद्योजक सुधीर मुंगसे ९८९००३३८८४
पिंपरी-चिंचवड महापालिका समन्वय – रविकांत वरपे ९७३००६८८००
सामान्य माणसाला जेंव्हा कोणतीच यंत्रणा न्याय देत नाही तेंव्हा न्यायालय ही त्याची शेवटची आशा असते.. किंबहुना इथं आपल्याला निश्चित न्याय मिळेल असा त्याचा गाढ विश्वास असतो, पण न्या. वर्मा प्रकरणामुळं या विश्वासाला निश्चितच तडा गेला, हे कुणीच नाकारणार नाही. आपल्या घरात आढळलेल्या नोटांची पोती कुठून आली, याचा हिशोबही या न्यायमूर्ती महाशयांना देता येत नसेल तर त्यांना न्यायमूर्ती म्हणायचं की भ्रष्टाचाराचे शिलेदार हे कळत नाही.
ज्यांना आपण न्याय‘देवता’ म्हणतो तिथंच वसुली होत असेल तर सामान्य माणसाने न्यायासाठी जायचं कुठं? भ्रष्टाचाराची ही कीड केवळ वर्मा यांच्यापर्यंतच मर्यादीत आहे की ती आणखी वाढत गेली हे खरंतर बघावं लागेल. पण हे चित्र बदलण्यासाठी मात्र सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील..!
#भ्रष्टाचार #न्यायव्यवस्था
कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही महाराष्ट्रात 'SIR' मोहीम एवढ्या घाईघाईत का राबवली जातेय? केवळ ४ दिवस उरले असताना १८% मतदारांची प्रपत्रे अद्याप जमा झालेली नाहीत. पश्चिम बंगालमध्येही १२% (९१ लाख) मतदारांची नावे वगळून लोकशाहीचा ज्याप्रमाणे गळा घोटला तोच #बंगाल_पॅटर्न महाराष्ट्रात राबवून मतदारांचा हक्क हिरावून घेऊन सत्तेचा मार्ग सोपा करण्याचा राजकीय कट सरकारकडून रचला जातोय का? अशी शंका यामुळं निर्माण होते.
पुरेशी संधी आणि वेळ दिल्याशिवाय कोणत्याही मतदाराला लोकशाहीने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क हिरावून घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगासह कुणालाच नाही. सरकार पुरस्कृत हा कट आम्हीही कदापि यशस्वी होऊ देणार नाही. मतदारांना प्रपत्रे जमा करण्यासाठी निवडणूक आयोगाने तातडीने वेळ वाढवून द्यावा, प्रसंगी स्वतःच्या यंत्रणेमार्फतही खात्री करावी. याबाबतच चर्चा करण्यासाठीच वेळ देण्याची विनंती आम्ही निवडणूक आयोगाला केली, परंतु अद्यापही वेळ देण्यात आलेली नाही, आम्ही अजूनही वाट पहात आहोत.
Election Commission of India
13/08/2026
विनोद, व्यंग, साहित्य, पत्रकारिता आणि समाजप्रबोधन या सर्व क्षेत्रांत आपल्या लेखणीची तलवार आणि वाणीची धार कायम ठेवणारे, थोर समाजप्रबोधक प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#आचार्य_अत्रे
13/08/2026
लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, न्यायप्रिय आणि दूरदर्शी राज्यकर्त्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर #राजमाता #स्मृतिदिन #अभिवादन
Category
Contact the public figure
Website
Address
Srujan House, Ganeshdatta Co-Operative, SHRUJAN HOUSE, Plot No 10A, HSG Society, Sahakar Nagar, Parvati
Pune
411009