MAITRI

MAITRI

Share

MAITRI is a non-profit, volunteer-based organization based in Pune, India. Apart from work in Melghat, Maitri also works in natural disasters.

MAITRI's main strength is the volunteers from all over the world who contribute not only financially but also give their time and skills towards social cause. MAITRI stated its activities in 1997 with the aim of eradicating malnutrition from Melghat (remote forest region in Amaravati district of Maharashtra). Since then, Maitri volunteers are continually working for betterment of Korku tribals in Melghat. MAITRI is registered as a Public Trust in 1999 under the Public Trust Act. The trust acts as a custodian and umbrella support for all the activities in terms of help to raise and manage funds, training, building awareness, administration and general management of the resources. But the real drive and force of MAITRI is its VOLUNTEERS who provide the distinct character to the organization.

08/09/2026

"मेळघाटसाठी स्वयंस्फूर्त (Voluntary) कामाची संधी.. ते ही, मेळघाटात न जाता !"

या आवाहनाला प्रतिसाद देऊन दोन विषयांवर तिघांनी काम सुरू केलं आहे आणि तीन जणांसोबत त्यांना आवडेल अशा कामाचा शोध सुरू आहे!

तुम्हालाही मेळघाटसाठी स्वयंस्फूर्त काम करण्याची इच्छा असल्यास जरूर संपर्क साधा...

संपर्क करा. फोन नको. फक्त तुमचं नाव ९३०९९ ३००१० वर WhatsApp करा किंवा मेसेज द्या. आम्ही संपर्क करू.

Photos from MAITRI's post 07/09/2026

Maitri report 2026 Eng

Photos from MAITRI's post 07/09/2026

ॲागस्ट महिन्याचा मराठी अहवाल..

19/08/2026

There are numerious ways you can do Voluntary Work !

You can do very valuable work for our friends in Melghat and there is no need to go and travel for 800 kms !

If you have a computer, good internet and can contribute 30 hours of Internet Search work, then that is going to help our Melghat friends enormously.

If you are willing to do this, send your name and mobile number to us. Thank you !

*Contact us.* Please do not call. Just WhatsApp your name to [93099 30010](tel:93099 30010) or leave a message. We will get in touch with you.

19/08/2026

मेळघाटसाठी स्वयंस्फूर्त (Voluntary) कामाची संधी.. ते ही, मेळघाटात न जाता !

स्वयंस्फूर्त कामाच्या अनेक पध्दती आहेत. त्यासाठी घरनं उठून आठशे किलोमीटर्स जाण्याची गरज नाही. न जाताही अगदी मौल्यवान, अर्थपूर्ण मदत तुम्ही करू शकाल.

तुमच्याकडे कम्प्युटर असेल, चांगलं इंटरनेट असेल आणि १ ते १५ सप्टेंबर दरम्यान साधारण ३० तासांचं इंटरनेट सर्चचं काम करू शकत असाल तर आपल्या मेळघाटातील मित्रांना खूप मदत होणार आहे..

तसं असेल तर तुमचं नाव आणि मोबाईल क्रमांक कळवा.. धन्यवाद !

संपर्क करा. फोन नको. फक्त तुमचं नाव ९३०९९ ३००१० वर WhatsApp करा किंवा मेसेज द्या. आम्ही संपर्क करू.

Photos from MAITRI's post 11/08/2026

‘मैत्री’साठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट!

डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी, अमरावती (Mission IAS) तर्फे, ‘मैत्री’च्या रामेश्वर फड यांना नुकतंच ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं.

‘मैत्री’च्या मेळघाटमधल्या कामाची धुरा रामने अगदी सुरूवातीपासून सांभाळली आहे. मेळघाटातल्या दुर्गम अशा चिलाटी या गावात राम पहिली १५ वर्ष राहिला. या परिसरातल्या कोरकू लोकांशी आमची मैत्री रामच्या माध्यमातूनच झाली. गेल्या २८ वर्षाच्या या प्रवासाने एक टप्पा पूर्ण करून आता दुसर्‍या टप्प्याची सुरूवात केली आहे. बालमृत्यू, कुपोषण कमी झालं, आता ‘संपूर्ण शिक्षणा’ची मोहीम आखली आहे.

राम, तुझं ‘मैत्री’च्या सर्व मित्रांतर्फे खूप अभिनंदन!

या सन्मानाने आपल्या सर्वांनाच या मोठ्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे...

Photos from MAITRI's post 05/08/2026

अहवाल जुलै

27/01/2026

Back and forth communication with our team in Chilati took 20-30 days, way back in 1998 when we began work. What a revolution it is for us today, when we could speak online with them, LIVE!

16/01/2026

'मैत्री'च्या मंगळवारच्या साप्ताहिक बैठकीत मी पहिल्यांदा आलो होतो २००८ मध्ये. पण प्रत्यक्ष काम करायची संधी यायला २०१३ साल उजाडावं लागलं. जानेवारी २०१३ मध्ये मी मेळघाटात तिथे नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत आणि पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण द्यायला आम्ही गेलो होतो. अर्थात प्रशिक्षण द्यायला गेलेलो मी, त्यांच्याचकडून अनेक गोष्टी शिकून आलो, असा तो समृद्ध अनुभव!

पुढे माझा आणि मैत्रीचा संबंध येत राहिला नैसर्गिक आपत्ती आल्या त्या त्या वेळी. उत्तराखंडमध्ये आलेल्या ढगफुटी आणि पुरानंतर मैत्रीचा कार्यकर्ता म्हणून मी सलग १५-२० दिवस पुनर्वसनाच्या कामासाठी गेलो होतो. त्यानंतर केरळ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी आलेल्या पुराच्या वेळेसही मदतकार्यात मी सहभागी झालो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस सोशल मिडिया फोटो पुरते मदतकार्य करणारे अनेक असतात. पण त्या पलीकडे जात सूत्रबद्ध नियोजन करून, नेमके गरजू शोधून लांब पल्ल्याचे काम शांतपणे उभारायचा विचार मैत्री करते हे विशेष कौतुकास्पद आहे. 'कामासाठी काम', 'प्रसिद्धीसाठी काम' अशा दुष्टचक्रात अडकलेल्या सामाजिक संस्था अनेक असताना 'परिणामासाठी काम' करणारी मैत्री वेगळी ठरते. ठरवून घेतलेली आर्थिक शिस्त, व्यवहारात पारदर्शकता यामुळे संस्थेची विश्वासार्हता वादातीत आहे."

- तन्मय कानिटकर, पुणे (संचालक- अनुरूप विवाहसंस्था)

येत्या रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मैत्री सहभागी होत आहे आणि मेळघाटातील कामांसाठी निधी संकलन करत आहे. आपणही यात सहभागी व्हावं. देणगीसाठीची लिंक पहिल्या कमेंटमध्ये.

Tata Mumbai Marathon

Photos from MAITRI's post 14/01/2026

११ जानेवारी रोजी नाशिकच्या कॉलेज रोडवर आयोजित “Saree Run” मध्ये मैत्रीचे volunteers सारंग दंडाळे, मुक्ता आणि तिच्या मैत्रिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशात या रनमध्ये सहभाग घेतला. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधत, त्यांनी मैत्रीच्या मेळघाटातील शिक्षणविषयक कार्याबद्दल माहिती दिली.

हा केवळ एक रन नव्हता, तर शिक्षणासाठी उभं राहण्याचा, संवाद साधण्याचा आणि समाजाला जोडण्याचा एक सुंदर प्रयत्न होता.

या आठवड्याच्या रविवारी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये मैत्री सहभागी होणार आहे. यानिमित्ताने आपले मित्र Harshad Ramchandra Pendse मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर धावणार असून मैत्रीच्या मेळघाटमधील कामांसाठी निधी संकलन करत आहेत. आपणही आम्हाला यात सोबत करावी. देणगी देण्यासाठी लिंक्स कमेंट्समध्ये.

Telephone

Address


Vithal Mandir Road
Pune
411052

Opening Hours

Monday 9:30am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9:30am - 1pm