Bal Ranjan Foundation

Bal Ranjan Foundation

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bal Ranjan Foundation, Non-Governmental Organization (NGO), khashaba jadhav PMC school, chhatrapati shivaji nagar Pune, Pune.

बाल रंजन फाउंडेशन
'होम फॉर होमलेस वूमन' प्रकल्पाद्वारे निराधारांना सुरक्षित निवारा, वैद्यकीय मदत, समुपदेशन, कौशल्यविकास आणि रोजगार संधी देत आहोत. तुमचं सहकार्य गरजूंना आत्मनिर्भर बनवू शकतं. मदतीसाठी संपर्क करा! 🙏 #TransformLives

05/09/2026

दहीहंडीच्या या मंगलमय पर्वानिमित्त
आपल्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि एकतेचा रंग भरू दे. ✨
दहीहंडी निमित्त हार्दिक शुभेच्छा! 🙏🌸
— बाळ रंजन फाउंडेशन

04/09/2026

🦚✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🦚

🙏 बाळ रंजन फाउंडेशनच्या वतीने 🙏

आपणांस व आपल्या परिवारास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 💙🌸

✨ “जय श्रीकृष्ण” ✨

21/08/2026

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग व बाळ रंजन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थी ऋतुपर्ण जाधव याची चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. 💐

मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल ऋतुपर्णचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎓✨

तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟

20/08/2026

बाळ रंजन फाउंडेशनचा १० वा वर्धापन दिन उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. 🎉💐

गेल्या १० वर्षांच्या सामाजिक कार्याच्या प्रवासात मिळालेले प्रेम, सहकार्य आणि विश्वास यासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏❤️

यापुढेही समाजसेवेचे हे कार्य अधिक जोमाने आणि समर्पणाने सुरू ठेवण्याचा संकल्प! 🌱✨

बाळ रंजन फाउंडेशन
💙 सेवा • संस्कार • समर्पण 💙

#10वा_वर्धापनदिन #सेवा_संस्कार_समर्पण

Photos from Bal Ranjan Foundation 's post 19/08/2026

🇮🇳 हर घर तिरंगा २०२६🇮🇳

दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी निवारा केंद्र येथे ‘हर घर तिरंगा २०२६’ अभियानांतर्गत तिरंगा संकल्पनेवर आधारित राखी निर्मिती व तिरंगा थीम सजावट उपक्रम उत्साहात पार पडला. 🇮🇳✨

निवारा केंद्रातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः राख्या तयार केल्या व केंद्राची आकर्षक तिरंगा सजावट केली. 🎀🇮🇳

उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सर्जनशीलतेचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.

देशभक्ती, सर्जनशीलता आणि आनंदाने भरलेला हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला!❤️🇮🇳

TirangaRakhi PatrioticSpirit Pune

Photos from Bal Ranjan Foundation 's post 19/08/2026

🇮🇳✨ **स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!** ✨🇮🇳

दिनांक **१५ ऑगस्ट २०२६** रोजी **बाळ रंजन फाऊंडेशनच्या टीमने व निवारा केंद्रातील महिलांनी** एकत्र येत स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा केला. 🇮🇳❤️

या प्रसंगी निवारा केंद्रात विविध उपक्रम, आनंदाचे क्षण आणि देशभक्तीने भारलेले वातावरण अनुभवायला मिळाले. सर्वांनी एकत्र येऊन **स्वातंत्र्य, एकता आणि देशप्रेमाचा संदेश** दिला.

निवारा केंद्रातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि बाळ रंजन टीमचे सहकार्य यामुळे हा दिवस अधिक खास आणि अविस्मरणीय ठरला. 🌸✨

**स्वातंत्र्याचा उत्सव, एकतेचा संदेश आणि नव्या आशेची सुरुवात!** 🇮🇳

**जय हिंद! जय महाराष्ट्र!** ❤️🇮🇳

JaiHind PatrioticSpirit Unity Freedom Celebration

19/08/2026

💙 बाळ रंजन फाऊंडेशनचा १० वा वर्धापन दिन 💛

१० वर्षांचा प्रवास… सेवाभावाचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाचा! ✨

गेल्या दशकभरात बाळ रंजन फाऊंडेशनने गरजू व बेघर महिलांना निवारा, सुरक्षितता, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्यसेवा, मानसिक आधार आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

या प्रेरणादायी प्रवासात साथ देणारे हितचिंतक, दाते, सहकारी, स्वयंसेवक, संस्था आणि प्रत्येक सहभागी व्यक्तीचे मनःपूर्वक आभार! 🙏

आपल्या विश्वासाच्या आणि सहकार्याच्या बळावर पुढील वाटचाल अधिक व्यापक आणि प्रभावी करण्याचा संकल्प… 🌱

“सेवेतून समाधान… सहकार्यातून परिवर्तन!” 💙💛

Photos from Bal Ranjan Foundation 's post 13/05/2026

बाळ रंजन फाऊंडेशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बेघर महिला निवारा केंद्र प्रकल्पाची माहिती जाणून घेण्यासाठी सौ. स्मिता सुधीर कोंढरे – नगरसेविका, पुणे महानगरपालिका, श्री. सुधीर (बापू) विनायक कोंढरे – संस्थापक अध्यक्ष, जनहित मंच तसेच श्री. महेंद्र दादा मेघा संजय कोंढरे – अध्यक्ष, श्रीचक्रधर परमानंद शिक्षण संस्था यांनी निवारा केंद्रास सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांनी निवारा केंद्रातील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निवास, अन्न, स्वच्छता, सुरक्षा व इतर मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी केली. तसेच संस्थेमार्फत व प्रकल्पामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा, व्यवस्थापन पद्धती आणि स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करत विशेष कौतुक केले.
सदर भेटीमुळे प्रकल्पास अधिक प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही बेघर व गरजू महिलांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला.

Photos from Bal Ranjan Foundation 's post 05/05/2026

बेघर निवारा केंद्र हे निराधार व गरजू महिलांसाठी सुरक्षित आणि सन्माननीय निवाऱ्याचे ठिकाण आहे. येथे निवारा, अन्न, आरोग्य सेवा तसेच आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते.

या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षित वातावरण देऊन त्यांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. 🤝

SafeShelter

Photos from Bal Ranjan Foundation 's post 02/05/2026

🚩 महाराष्ट्र दिनानिमित्त बेघर निवारा केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आठवण ठेवत उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

#महाराष्ट्रदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #बेघरनिवाराकेंद्र

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Khashaba Jadhav PMC School, Chhatrapati Shivaji Nagar Pune
Pune
411005