Rasik Sahitya

Rasik Sahitya

Share

Rasik Sahitya is a renowned book store in Pune, Maharashtra, India since 1964 which has the largest

23/04/2026

नमस्कार,
आज जागतिक पुस्तक दिन
पुस्तकं म्हणजे अनेक आठवणींचा खजिना...
पुस्तकं आपले सर्वात जवळचे मित्र असतात... जे आपल्याला हसवतात, जगण्याची नवी उमेद देतात आणि कठीण प्रसंगात आपला हात घट्ट धरून ठेवतात.

“दिसा माजी काही तरी ते लिहावे,
प्रसंगी अखंडीत वाचीत जावे.”
अशा शब्दात संतांनी देखील वचनाचा उपदेश केला आहे.
हाच विचार पुढं देण्यासाठी आणि आपल्या मातीत अन् इथल्या रसिक वाचकांच्या हृदयात पुस्तकांबद्दलची आपुलकी अधिक घट्ट करण्यासाठी, आपण एक स्वप्न पाहिलं...
ते म्हणजे ‘पुणे पुस्तक महोत्सव'.
मागील तीन वर्षे हा महोत्सव अत्यंत अभिमानाने आपल्या पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव वाढवत आहे.
या तीन वर्षांत या महोत्सवाने खूप काही दिलं...
नवीन पुस्तक हातात पडल्यावर लहान मुलांच्या डोळ्यांत चमकणारं कुतूहल, तरुणांचा उत्साह आणि ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील एक शांत समाधान. हे सगळं पाहताना वाटतं... की आपल्या सर्वांची मेहनत सार्थकी लागत आहे.
तंत्रज्ञानाच्या या वेगातही आपण पुस्तकांशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही, हीच आपली खरी श्रीमंती आहे.
आज 'जागतिक पुस्तक दिन,
चला तर मग, आज स्वतःला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला एक पुस्तक भेट देऊया आणि हा वाचनाचा वसा असाच पुढे नेऊया.
सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Pune Book Festival
[World Book Day, Book Lover, Books, Pune Book Festival, Maharashtra, Rajesh Pande]

19/04/2026

रसिक साहित्य च्या 62 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने सर्व
वाचकांचे मनःपूर्वक आभार! सर्व लेखक, प्रकाशक, संपादक, मित्र,हितचिंतक रसिक चे सहकारी वर्ग
सर्वांचे रसिक वरचे प्रेम, विश्वास सदैव राहो.
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!
सर्वांना अक्षय तृतीया च्या सर्वांना शुभेच्छा!
#पुस्तकप्रेमी #वर्धापनदिन

15/04/2026

हिरण्यगर्भ’ कहाणी ब्रह्मांडनायकाची

“हम गया नहीं, जिंदा हैं ।” हे केवळ आशीर्वाद नाहीत तर ती आहे अनुभूती श्री स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची. लहानपणी मूल पालकांचा हात धरून हळूहळू एक-एक पाऊल टाकते आणि पुढे जात राहते. चालत असताना, ते काही वेळा धडपडते. त्या वेळी त्याचे पालकच त्याला उठण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठीही प्रोत्साहित करतात, अगदीच त्याला उठता येत नसेल, तर हात धरून उठवतात. श्री स्वामी समर्थ ही जगन्माउलीदेखील अशीच असल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेक वाचकांनी घेतला असेल.
अडचणीच्या प्रसंगीच नाही, तर सतत ते आपले मूल धडपडत नाही ना ?, चुकीचे काही करत नाही ना ? यासाठी आपल्या बरोबर असणारे स्वामी समर्थ. ते जरी म्हणत असले, की ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,’ तरी ते पाठीशी नाही, तर आपल्याबरोबरच असतात, पण त्यांचा सहवास अनुभवण्यासाठी तेवढी पात्रता मिळवण्यासाठी आपल्याला उत्तम कर्म केली पाहिजेत.
आपल्या भक्तांबरोबर आपण कसे असतो आणि त्यांचा उद्धार कसा करतो, हेच या ‘हिरण्यगर्भ’ पुस्तकात श्री. आठवले यांनी मांडले आहे. या पुस्तकावरील मुखपृष्ठ चितारले आहे, श्री स्वामी समर्थांची कृपादृष्टी लाभलेल्या श्री. शेखर साने यांनी.
मुखपृष्ठ उलडल्यानंतर श्री स्वामी समर्थांचाच सहवास आपल्याला लाभतो आहे, या विचारांमधून वाचक या कादंबरीतील प्रकरणांमध्ये रंगून जातो. कादंबरी वाचत असताना त्याची ब्रह्मानंदी टाळी लागली नाही तरच नवल.
लेखकाच्या कल्पनेतून, भावविश्वातून लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचे संपादन केले आहे, डाॅ. जयश्री उपाध्ये यांनी.
गुरुतत्त्व एकच आहे, हा या कादंबरीचा गाभा आहे. श्री स्वामी समर्थांनी जवळजवळ ७३ ० वर्ष केलेल्या लीला, शिकवणूक आणि चमत्कारांची ही कहाणी आहे. या कादंबरीचे लेखन करताना लेखकाने जणू त्यांचे बाळ होऊन, त्यांच्या कडेवर बसून स्वामींच्या ७३० वर्षांच्या प्रवासाचा साक्षी होण्याचा प्रयत्न कथारूपात उलगडला आहे. अनेक साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांच्याभोवती ही कादंबरी गुंफली गेली आहे.
स्वामींनी अनेक भक्त, योगी, सत्पुरुष, साध्वी, योगिनी यांच्या जीवनप्रवासात, त्यांना हाती धरून चालवले, त्यांच्यासह अनेक लीला केल्या. त्यांची वर्णने या कादंबरीत आहेत.
या कादंबरीचे प्रमुख वैशिष्ट्य असे, की लेखकाने सुरुवातीला स्वान्तसुखाय हे स्वैर लेखन केले. स्नेह्यांच्या आग्रहावरून प्रसारमाध्यमांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविले. केवळ ५५ दिवसांमध्ये केलेल्या या लेखनातून ही अप्रतिम अशी कादंबरी निर्माण झाली.
कादंबरीच्या सुरुवातीपासून - श्री स्वामी समर्थांच्या आगमनापासून त्यांच्या निर्वाणापर्यंत वाचक भावविभोर होतो. हीच भावना कादंबरी वाचनानंतरही त्याच्यावर रेंगाळत राहते आणि त्याचा प्रत्येक कर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, हे नक्की. त्यामुळेच या कादंबरीच्या वीस हजारांहून जास्त प्रती विकत घेऊन स्वामी भक्तांनी वाचल्या. श्री. आठवले यांचे प.पू. सद्गुरू श्री जनार्दन स्वामी खेर, बडोदा यांच्यासह श्री स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद लाभल्यामुळेच हे शक्य झाले आहे, हे नक्की.

श्रीराम ओक

लेखक- सखाराम आठवले.
प्रकाशक- रसिक आन्तरभारती
पृष्ठ- ३९८, किंमत- ५५०/-

14/04/2026

घरबसल्या वाचनाचा मनोसोक्त आनंद मिळवण्यासाठी
रसिक ची घरपोहोच वाचन योजना आजच सुरू करा ..
महिन्यातून एकदा एका वेळेस 5 पुस्तकं तुमच्या पसंतीची
संपर्क - +91 9823077622
#मराठीपुस्तक #रसिक_वाचन_योजना #रसिकसाहित्य

26/03/2026

रहीमपूरचा रहिवासी असलेल्या या तेलियाचा जन्म हा योगायोगाने रामनवमी झाला.. तर झालं असं की,राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर आणि आदींशी वाळवंटाख्यान च्या गप्पा मारताना माजगावकरांनी लेखक गिरीश कुबेर यांना कोरा कागद पुढे केला आणि म्हणाले ‘’हे सगळं लिहून काढा.. नाहीतरी जात्यावर बसलेलेच आहात …! रामनवमी आहे आज, चांगला दिवस आहे. लगेच मुहूर्त करून टाका.’’

* सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरूण. ‘ओपेक’, ‘ओआपेक’ सारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ.
* कार्लोससारख्या कुप्रसिद्ध दहशतवाद्यालाही शह देवू शकणारा सौदी तेलमंत्री.
* तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवून टाकणारा एक अवलिया.
* एक अफलातून तेलिया ‘शेख अहमद झाकी यामानी’ ची डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी त्याची ही कथा
‘एका तेलियाने’
लेखक - गिरीश कुबेर
प्रकाशन - राजहंस प्रकाशन
छापिल किंमत- ४००/- ₹
घरपोहोच मागवा - +91 9371218371

27/02/2026
25/01/2026

Sanjay Dabke #म्युझिअम #नवेपुस्तक

Category

Telephone

Address


683, Budhwar Peth, Appa Balwant Chowk, Near Jogeshwri Mandir
Pune
411002

Opening Hours

Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rasik Sahitya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.