Kalam Kayda
Kalam Kayda ⚖️ – भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज.
RTI, तक्रार अर्ज व कायदेशीर मार्गदर्शन. सामान्य नागरिकांना हक्क समजावून अन्यायाविरुद्ध उभे राहायला सक्षम करतो. कायदा माहिती असला की अन्याय थरथरतो!
22/07/2026
PMC चे नाव घेऊन डंपिंग? पाठपुराव्यानंतर संपूर्ण राडारोडा उचलला!
खराडी जेन्सर ग्राउंडवर डंपिंगचा कहर! 🌳 झाडे बुजवली? PMC चे नाव पुढे… काम कोणाचे?
🚨 खराडी आयटी टॉवर परिसरातील जेन्सर ग्राउंडवर नेमकं चाललंय तरी काय?
ज्या मैदानावर लहान मुले सायकल शिकतात, क्रिकेट व विविध खेळ खेळतात, ज्येष्ठ नागरिक वॉकिंगसाठी येतात आणि स्थानिक नागरिक मोकळा श्वास घेण्यासाठी येतात—त्याच परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामाचा राडारोडा, माती, झाडांच्या फांद्या तसेच अज्ञात व संशयास्पद मिश्र कचरा आणून टाकला जात असल्याचे दृश्यांमध्ये दिसत आहे.
फुटओव्हर ब्रिजवरून बॅनर कोसळला! नागरिकांच्या जीवाशी खेळ? तक्रार कशी करायची | Kalam Kayda
ठाण्यातील फुटओव्हर ब्रिजवर लावण्यात आलेला बॅनर अचानक कोसळल्याची घटना समोर आली आणि पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला —
जनतेच्या जीवाशी खेळून प्रसिद्धी मिळवायची का?
🚨 वडगाव शेरी साईनाथ नगर चौकात ट्रॅफिक जाम! बिल्डरच्या खुदाईमुळे नागरिक त्रस्त?
साईनाथ नगर चौक येथे रस्त्यालगत जेसीबी, पोकलेन व डंपरच्या माध्यमातून खोदकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
रस्त्यावर डंपर उभे करून मुरूम भरला जात असल्याने वाहनचालक, महिला व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
७ हजार कोटींचा प्रकल्प… पहिल्याच पावसात पोलखोल!
७ हजार कोटींचा प्रकल्प, मोठमोठे दावे आणि पहिल्याच पावसात अशी अवस्था? सुरक्षा भिंत कोसळली, रस्ता चिखलात गेला, आणि जनतेसमोर मोठे प्रश्न उभे राहिले. जनतेच्या पैशांचा हिशोब कोण देणार?
Legal Disclaimer : हा व्हिडिओ जनजागृती व सार्वजनिक हितासाठी आहे. कोणाचीही बदनामी करणे हा उद्देश नाही.
पुणे शहर व जिल्ह्यातील शाळांना ६ जुलै रोजी सुट्टी! रेड अलर्टमुळे प्रशासनाचा मोठा निर्णय!
भर पावसात Police Checking! कर्तव्याला सलाम… पण जीव धोक्यात?
भर पावसात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांना सलाम. पण ओल्या, घसरड्या रस्त्यावर बॅरिगेटिंग आणि checking करताना पोलीस व नागरिक दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हा व्हिडिओ जनजागृतीसाठी आहे. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
कर्जमाफी झाली तरी 7/12 वर बोजा?
कर्ज फेडलं किंवा कर्जमाफी झाली तरी 7/12 वर पतसंस्था/सोसायटीचा बोजा दिसत असेल, तर घाबरू नका.
7/12 प्रत, No Dues, कर्जफेड पावती आणि पैसे मागितल्याचे पुरावे जमा करा.
लेखी अर्ज करा, पोच पावती घ्या आणि कायद्याने उत्तर मागा.
तलाठी पैसे मागतोय? सातबारा-फेरफारसाठी शांत बसू नका! कायदेशीर कारवाई करा
सातबारा, 8-अ, फेरफार, वारस नोंद किंवा नोंदीची दुरुस्ती करण्यासाठी तलाठी / सर्कल / महसूल कर्मचारी पैशाची मागणी करत असेल, किंवा “सर्कलची सही बाकी आहे”, “फाईल वर आहे”, “नेट बंद आहे”, “कागद कमी आहेत” अशी कारणे देऊन काम प्रलंबित ठेवत असेल, तर शांत बसू नका.
Category
Website
Address
Pune
411001
Alerts
Be the first to know and let us send you an email when Kalam Kayda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.