Swami Kitchen
घरात बनवलेले घरगुती पदार्थ
पारंपारिक मराठी पदार्थ उदारणार्थ :- पुरणपोळी, पाकातील पुरी, सांज्याची पोळी, साटोरी, रताळ्याचा शिरा, उपवासाची मिसळ .... ..... ..... आणि बरेच काही ...........
27/07/2019
कोबीचे भानोळ
आज स्वामी किचन अधिकृत रित्या बंद करण्यात आले आहे, ग्राहकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही शतशः ऋणी आहोत.
*येत्या २६ जानेवारीला स्वामी किचन बंद होतंय, त्याच दिवशी संध्याकाळी आमचा प्रसिद्ध वडा इतिहासजमा होण्यापूर्वी, शेवटचा वडा खाण्यासाठी आपल्याला मनापासून आमंत्रण*
*मीरा- श्रीरंग*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
17/01/2019
स्वामी किचन बंद होतंय
सात वर्षांची प्रचंड मेहनत, "शेठ" ही नवीन उपाधी, खुपसं समाधान, नवनवीन केलेले प्रयोग, मला "स्वामी" हे टोपणनाव, दगडी शाळेसमोरचा चौक म्हणजे स्वामी किचन चा चौक हे सगळं इतिहास जमा होतंय २६ जानेवारी २०१९ ला 😔.
काही वेळा चुकलेली आर्थिक गणितं, आराखडे, आयत्या वेळी जेव्हा खूप गरज असताना, न मिळू शकलेली आर्थिक मदत, कामगारांचे प्रश्न, वाढती महागाई यांचा मेळ घालण्यात आलेलं अपयश, यांमुळे हा निर्णय घेतलाय.
अर्थात काही मैत्रांनी पदरमोड करून मला अडचणीच्या वेळी मदत केली त्याबद्दल खरच मी कृतज्ञ आहे.
गाठीशी आलेल्या काही खूप सुंदर आठवणी, अनेक दिग्गजांनीं दिलेली स्वामी किचन ला भेट, सलग तीन वर्षे मिळालेले उत्कृष्ट वडापाव चे पारितोषिक, उत्कृष्ट पदार्थांना मिळालेली मान्यवरांची शाबासकी, असे अनेक मोलाचे क्षण माझ्या झोळीत जमा झालेत.
खोल गर्तेत बुडण्यापेक्षा थांबलेलं बरं नाही का??
नव्या दिशेने वाटचाल सुरू करायचं म्हणतोय, आपले आशीर्वाद आणि पाठबळ हे पाठीशी असेलच याची खात्री आहे.
भेटत राहूच
आपलंच
स्वामी किचन
श्रीरंग, मीरा
02/11/2018
दिवाळी फराळ
01/11/2018
11/09/2018
लोभस मधाळ सात्विक व्यक्तिमत्व आज स्वामी किचन मध्ये
वासंती वर्तक
बरोबर आमचा एक टॅगियन मित्र भूषण गायकवाड
17/08/2018
खास श्रावणी शुक्रवार करिता तेलपोळी
14/08/2018
ज्येष्ठ रंगकर्मी, आणि सुधा करमरकर यांच्या बाल रंगभूमीचे निष्ठावान कार्यकर्ते, श्री माधव चिरमुले स्वामी किचन मधे.
03/07/2018
सुप्रसिद्ध अभिनेते, निवेदक श्री विघ्नेश जोशी, स्वामी किचन मधे
सगळ्या ग्राहकांना नम्र विनंती, भाज्या पार्सल हव्या असल्यास घरून स्टील चे डबे घेऊन यावेत.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Govind Bachhaji Marg
Thane
400601
Alerts
Be the first to know and let us send you an email when Swami Kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.